‘बाबूजी आणि मी’ मधील सुमधुर गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

    27-Mar-2023
Total Views |
 
 

Babuji 
 
मराठी चित्रपटसृष्टी व संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या अलाैकिक प्रतिभेचा आविष्कार असलेली आणि गदिमा, सुधीर माेघे यांच्यासारख्या ख्यातनाम गीतकारांच्या लेखणीतून अजरामर झालेली गीते प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी सादर करत रसिकांवर स्वरमाेहिनी घातली. बाबूजी आणि मी या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी अजरामर गाणी सादर करत रसिकांना मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची आठवण करून दिली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिकगणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे संगीत महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. महाेत्सवात गायक श्रीधर फडके व सहकाऱ्यांनी बाबूजी आणि मी हा कार्यक्रम सादर केला.देवत्वाचा अर्थ सहज साेप्या भाषेत मांडणारे गदिमांची देव देव्हाऱ्यात नाही देव नाही...
 
या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली रचना देवाचिये द्वारी उभा क्षणभरी या गीताने वातावरण भक्तिमय केले.बाबूजींची हिंदी रचना असलेले लता मंगेशकर यांच्या आवाजात प्रसिद्ध गीत ज्याेती कलश छलके.. हे गीत सादर केले.श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली समर्थ रामदासांची रचना माई माेरे नैनं श्याम सुरंग हे रामाशी एकरूप करणाऱ्या रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली.त्यानंतर सुधीर माेघे यांनी लिहिलेले, राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेले सखी मंद झाल्या तारका हे गीत कलाकारांनी सादर करून श्राेत्यांची मने जिंकली.हा संगीत महाेत्सव 30 मार्चपर्यंत सुरू राहणार असून, गणेश कला क्रीडा मंच येथे राेज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत कलाकार आपली कला सादर करणार आहेत.