भिक्षेकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील

    27-Mar-2023
Total Views |
 
 

Ahmednagar 
 
मंगलप्रभात लाेढा यांची माहिती : अहमदनगरच्या वसुधा प्रकल्पाचे उद्घाटन वसुधा प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गाेशाळा व इतर समाजाेपयाेगी उपक्रम राबवण्यात येत असून, याचा पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगाेंद्यात सुरू हाेत आहे. भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
 
यापुढे असे प्रकल्प राज्यभर सुरू करण्याचा मानसही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लाेढा यांनी व्यक्त केला.विधिमंडळ दालनात प्रकल्पाच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी लाेढा बाेलत हाेते.या वेळी महिला व बालविकासविभागाच्या सचिव आय.ए. कुंदन, आयुक्त आर. विमला, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महिला आर्थिक विकास मंडळाच्या व्यवस्थापकीयसंचालक डाॅ. इंदू जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा नियाेजन अधिकारी नीलेश भदाणे आदी मान्यवर आणि श्रीगाेंदा तालुक्यातील महिला उपस्थित हाेत्या.
 
महिला व बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (अहमदनगर) विद्यमाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित गाेशाळा व इतर समाजाेपयाेगी उपक्रमांचा ऑनलाइनउद्घाटन साेहळा पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि लाेढा यांच्या हस्ते पार पडला. विखे-पाटील यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास लाेढा यांनी व्यक्त केला. वसुधा पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास विखेपाटील यांनी व्यक्त केला.