महिलांना कशा प्रकारचे पुरूष आवडतात?

    24-Mar-2023
Total Views |
 
 

womens 
चर्चेमध्ये अनेक विषयांमध्ये आवर्जून चर्चिला जाणारा आणि ज्यावर जाेरदार चर्चा रंगते, असा विषय म्हणजे महिलांना कसे पुरूष आवडतात? याबद्दल वेगवेगळ्या लाेकांचे वेगवेगळे विचार असतात.म्हणूनच यावर अजून तरी सहमती झालेली नाही. 2008 मधील जगातील सगळ्यात सेक्सी महिला म्हणून मीगन ाॅक्स हिला गाैरविण्यात आलं तेव्हा तिने सांगितले, तिशीच्या पुढील पुरूष अधिक आकर्षक वाटतात. म्हणजे महिलांना कसे पुरूष आवडतात, याविषयी असणाऱ्या अनेक मतांमध्ये आता पुरूषांचं वयही एक मुख्य मुद्दा ठरू लागला आहे.जगभरातील अनेक महिलांचं मात्र एका गाेष्टीवर सहमत झालेलं दिसतं, ते म्हणजे महिलाही पुरूषांच्या बराेबरीने काम करतात, कमावतात आणि त्यामुळे पुरूषांची संपत्ती व दिसणं हे त्यांच्यासाठी गाैण मुद्दे आहेत.महिला अशा पुरूषांकडे आकर्षित हाेतात, जे पुरूष त्यांच्या भावना जाणून घेतात व त्यांना भावना व्यक्त करण्याची संधी देतात.
 
एका महिलेच्या म्हणण्यानुसार, पूर्वी पुरूषाचं दिसणं याला अधिक महत्त्व हाेतं. पण आजच्या पिढीतील सुशिक्षित, आत्मनिर्भर महिला व्यक्तिमत्त्व, प्रामाणिकता, नियमितता याला अधिक महत्त्व देते.काही महिला प्रेमामध्ये पुरूषांचं वय हा सुद्धा गाैण मुद्दा मानतात.
23 वर्षीय एका तरूणीचं मत आहे, वय हा केवळ एक भ्रम आहे.जास्त वयाचे पुरूषच अधिक समजूतदार असतील असं नाही, तर 20 वर्षांच्या मुलाचे विचारही परिपक्व असू शकतात.तरीही अनेक महिलांना वाटतं की पुरूषांचं वय व परिपक्वता यांचा अगदी जवळचा संबंध आहे. म्हणूनच त्यांना मीगलचं म्हणणं पटतं. वयाच्या तिसाव्या वर्षी पुरूष अधिक परिपक्व हाेताे, संसार करावा असं त्याला मनापासून वाटायला लागतं. त्याच्या मनातील चंचलताही कमी हाेते. त्यामुळे एकाच जाेडीदारावर मनापासून प्रेम करण्यास तयार हाेतात.