अमेरिकेत मित्रांची टंचाई; एकटेपणाची समस्या वाढत आहे

24 Mar 2023 15:12:51
 

USA 
आर्थिक टंचाई जगाच्या पाचवीलाच पुजली आहे. म्हणजे आर्थिक टंचाई नेहमीचीच डाेकेदुखी आहे. परंतु, गेल्या 20 वर्षांत अमेरिकेत विचित्र टंचाई निर्माण झाली आहे. लाेकांना मित्र मिळत नाहीत, म्हणून एकटेपणाची समस्या वाढली आहे.अमेरिकेत दर सातव्या व्य्नतीला मित्र नाही. स्त्रियांना मैत्रिण मिळत नाही. पण, त्या आपसातच बाेलून आपल्या भावना व्य्नत करतात. पण, पुरुषांना एकटेपणा सलत आहे. यावर मनाेविकार तज्ञांनी 5 उपाय सुचविले आहेत. त्यात स्वतःशीच बाेला, साेशल मीडियावर नव्हे. तुमच्याच आसपास मित्र शाेधा, मैत्री आपाेआप हाेत नाही. विश्वास संपादन करावा लागताे.खेळात सामील व्हा व मित्र मिळवा असे हे 5 उपाय आहेत. अमेरिकेत नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेनुसार फ्नत निम्मे पुरुष मित्रांच्या संख्येच्या बाबतीत संतुष्ट आढळले. पण, 15 ट्नके लाेक असे हाेते की, त्यांचा एकही मित्र नाही. 1990 च्या तुलनेत हा एकटेपणा पाच पटीने जास्त आहे.
गेल्या 20-22 वर्षांपासून पुरुषांच्या मित्रांची संख्या सतत कमी हाेत आहे. त्यामुळे आपल्या मनातील भावना काेणाजवळ व्य्नतकराव्यात ही पुरुषांसाठी माेठी समस्या निर्माण झाली आहे. महिला आपसातच बाेलून भावना व्य्नत करतात व मन हलके करतात.पण, पुरुषांचे तसे नाही, पुरुष आपल्या अतिशय खासगी बाबी देखील विश्वासू मित्राजवळ व्य्नत करतात. यामुळे त्यांची बाॅन्डिंग चांगली हाेते.कित्येक वर्षांच्या जुन्या मित्राला पाठविलेला एक मेसेजसुद्धा मैत्री घट्ट करताे.जुलै 2022 मध्ये एका शाेधमासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये नमूद करण्यात आले की, एखाद्या जुन्या मित्राला अनेक वर्षांनंतर पाठविलेला एक मेसेजसुद्धा मैत्रीचे नूतनीकरण करून अधिक घट्ट करताे हा मेसेज. मित्राची खुशाली माहिती करण्यासाठी असू शकताे. पण, ताे फाॅरवर्डेड मेसेज नकाे.हा मेसेज जाणीव करून देताे की वेळ कमी आहे. पण आपल्या मैत्रीचा विसर पडलेला नाही. यामुळे जुन्या आठवनींना उजाळामिळताे. मित्र बनविण्याचे उपाय
1) सुरुवातीला अजब वाटेल. पण, मित्र बनविण्यासाठी स्वतःशीच बाेलावे लागेल.युनिव्हर्सिटी ऑफ रेडलँडसच्या मानसिक शास्त्र विभागाचे प्रमुख राॅबिनाेवित्ज म्हणाले की, आपल्या भावना लपवू नका.
2) तुमच्या स्वभावाला अनुकूल अशा ग्रुपमध्ये सामील व्हा. साेशल मीडियावर अनेक ग्रुप असतात. पण, हे ग्रुप तुमचा एकटेपणा दूर करू शकत नाहीत. यासाठी मंदिर, बगीचा, चहाच्या टपरीवर जा. तेथील लाेकांच्या बाेलण्यात सामील व्हा. तुम्हाला न्नकीच मित्र मिळतील.
3) मैत्री आपाेआप हाेते, असे समजू नका. शिक्षण असाे की नाेकरी काेणत्याही कारणाने आपण घरापासून दूर असताे.नव्या शहरात सहज मैत्री हाेत नाही.
Powered By Sangraha 9.0