वात, पित्त, कफ विकार नाहीसे करणारा आराेग्याचा रक्षक सूर्यप्रकाश !

24 Mar 2023 15:33:06
 
 

Sunlight 
 
सूर्याचा प्रकाश आपल्या आराेग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे आपल्याला ऐकून माहिती असतं. मात्र याकडे आपण म्हणावं तसं लक्ष देत नाही. आपल्या आजुबाजूला असणाऱ्या झाडांकडे नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, ज्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांची वाढ नीट हाेत नाही, त्यांच्यामध्ये ताजेपणा नसताे.सूर्यप्रकाश हा आपल्या सर्वांच्या जीवनशक्तीचं आगार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं सकाळी काेवळं ऊन घ्याल ते तुमच्या स्वास्थासाठी खूप महत्त्वाचं असतं. सूर्यप्रकाशामुळे वात, पित्त व कफ या सर्व राेगांचा नाश हाेताे. त्यामुळे माणूस चांगलं आयुष्य जगू शकताे.आपल्या आहारात अनेकदा जे घटक कमी असतात ते घटक आपल्याला सूर्याच्या किरणांमधून मिळत असतात.
 
उन्हातून आपल्याला ड जीवनसत्त्वमिळत असतं. यामुळे र्नतात कॅल्शिअम, फाॅस्फरस, लाेहाची मात्रा वाढते. यामुळे हाडं मजबूत हाेतात तसंच हाडं ठिसूळ हाेण्याची शक्यता कमी हाेते. शरीरात सर्व कार्य सुरळीत सुरू राहतात, प्रतिकारशक्तीवाढते. रक्तात लाल पेशी आणि पांढऱ्या पेशीची संख्या वाढते. राेज जर तुम्ही सकाळचं काेवळं ऊन घेतलं तर तुमची पचनव्यवस्था चांगली हाेते. अपचनाचा त्रास असला तर ताे दूर हाेत नाही.राेजच्या धावपळीत तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा झाेप पूर्ण हाेत नसेल तरसूर्यप्रकाश तुम्हाला मदत करेल. खाज, साेरायसिस, पांढरे डाग या सर्व प्रकारच्या त्वचा राेगांवर सूर्यप्रकाश मदतगार ठरताे.नवजात बाळ अनेकदा कावीळमुळे आजारी पडतात. त्यांना सकाळच्या काेवळ्या उन्हात घेऊन बसल्यास ही समस्या बऱ्याच अंशी कमी हाेते.
Powered By Sangraha 9.0