समस्या साेडविण्यासाठी सपाेर्ट ग्रुप उपयुक्त

    24-Mar-2023
Total Views |
 
 
 



Groups
संध्यानंद.काॅम मानव हा समूहाने राहणारा सजीव असल्यामुळे समाजाची निर्मिती झाली. एकमेकांच्या अडचणीच्या काळात काेणाची तरी मदत मिळणे त्यातून सुलभ झाले. आज भारतासह विविध देशांत असे आधार गट किंवा सपाेर्ट ग्रुप कार्यरत असून, त्यांचा जास्त फायदा महिलांना हाेताे आहे. एखाद्या क्षेत्रातील कर्मचारी असे गट तयार करून काम सुरू करतात, तर कधी एखाद्या समस्येत अडकलेली व्यक्तीसुद्धा असा गट सुरू करते.इतरांना मदत करणे असा या गटांचा हेतू असताे.एकाच प्रकारच्या समस्येला ताेंड देत असलेले लाेक सहसा अशा गटांकडे आधारासाठी येतात. यात त्यांना इतरांच्या अनुभवांतून मार्गदर्शन मिळते आणि सदस्यांच्या आवा्नयाबाहेरची समस्या असेल, तर तज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन घेता येते.
 
कशी मिळू शकते मदत? : एखादी व्यक्ती तिच्या व्यक्तिगत अथवा प्राेफेशनल आयुष्यात एखाद्या समस्येला सामाेरी जात असताना तिचे कुटुंबीय, नातलग अथवा मित्र मदतीला येतात. समस्येतून मार्ग काढण्यासाठी उपायसुद्धा सुचवितात. पण, काही वेळा या सर्वांच्या आवा्नयाबाहेरची समस्या असेल, तर काय करावे असा प्रश्न निर्माण हाेताे आणि तेथे मदतीला येताे आधार गट. व्यक्तीच्या आवा्नयाबाहेर असलेल्या समस्या साेडविण्यासाठीच या गटांची निर्मिती झाली आहे. समान समस्यांबराेबर झुंजणारे लाेक अशा गटांत असतात.
 
काेणी एखाद्या गंभीर विकाराबराेबर सामना करत असताे, काेणाला मानसिक तणाव-चिंता असतात तर काेणी कर्करुग्ण अथवा स्मृतिभ्रंश झालेल्यांची सेवा करत असतात. जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे काेणाला तरी माेठा धक्का बसलेला असताे, तर काही जण व्यसनाधीन झालेले असतात. अशा विविध लाेकांसाठी वेगवेगळे आधार गट कार्यरत असल्याचे दिसते. काेणाची समस्या काहीही असली, तरी स्वत: त्याचा अनुभव घेतलेली व्यक्तीच मदतीला याेग्य ठरते आणि आधार गटांचे वैशिष्ट्य हेच असते. अशा गटांतील लाेक अनुभवी आणि त्या प्रसंगातून गेलेले असल्यामुळे त्यांची मदत निश्चितच माेलाची ठरते आणि गरज भासल्यास, तज्ज्ञांचा सल्लाही मिळताे.
 
गुप्तता राखूनही घेता येते मदत : महिलांबाबत अनेक समस्या असतात आणि त्या साेडविण्यासाठी अनेक जणींना अशा आधार गटांची गरज असते. सध्याच्या काळात समस्याग्रस्त महिलांच्या मदतीसाठी साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मसह आणि अ‍ॅपच्या रूपाने अनेक ऑनलाइन आधार गट कार्यरत आहेत. आपली ओळख गुप्त ठेवून त्यावरून मदत घेता येते. तुमच्या समस्येनुसार त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्ला देण्यास उपलब्ध असतात. ते तुमची समस्या ऐकून घेतात आणि तुम्हाला हवे असेल, तर मार्गदर्शनही करतात. तुम्ही सामूहिक स्वरूपातसुद्धा समस्या मांडू शकता.अशा प्लॅटफाॅर्म्सवर तुम्हा इतरांचे अनुभवसुद्धा समजतात. येथे तुमच्याबाबत काेणी काही मतप्रदर्शनही करत नाही. मात्र, अशा गटांकडून मदत घेण्यापूर्वी त्यांची विश्वासार्हता तपासून पाहायला विसरू नका. गुप्तता राखूनही घेता येते मदत : महिलांबाबत अनेक समस्या असतात आणि त्या साेडविण्यासाठी अनेक जणींना अशा आधार गटांची गरज असते.
 
सध्याच्या काळात समस्याग्रस्त महिलांच्या मदतीसाठी साेशल मीडिया प्लॅटफाॅर्मसह आणि अ‍ॅपच्या रूपाने अनेक ऑनलाइन आधार गट कार्यरत आहेत. आपली ओळख गुप्त ठेवून त्यावरून मदत घेता येते. तुमच्या समस्येनुसार त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्ला देण्यास उपलब्ध असतात. ते तुमची समस्या ऐकून घेतात आणि तुम्हाला हवे असेल, तर मार्गदर्शनही करतात. तुम्ही सामूहिक स्वरूपातसुद्धा समस्या मांडू शकता.अशा प्लॅटफाॅर्म्सवर तुम्हा इतरांचे अनुभवसुद्धा समजतात. येथे तुमच्याबाबत काेणी काही मतप्रदर्शनही करत नाही. मात्र, अशा गटांकडून मदत घेण्यापूर्वी त्यांची विश्वासार्हता तपासून पाहायला विसरू नका. ते माझ्यावर टीका करतील का? - काेणाच्या समस्येवर टीका करावयाची नाही आणि मतही व्यक्त करावयाचे नाही हे काेणत्याही चांगल्या आधार गटाचे लक्षण असते.
 
 एखाद्या आधार गटात गेल्यावर आणखी नैराश्य येते का? - काेणत्याही गटातील लाेकांसमाेर आपली समस्या मांडताना थाेडा संकाेच वाटणे साहजिक असते. पण, इतर लाेकही आपल्यासारखेच आहेत आणि त्यांच्यापुढेसुद्धा अडचणी आहेत हे लक्षात आल्यावर तुमचा संकाेच दूर हाेईल. नैराश्य येण्याचे कारण नाही.कसे तयार हाेतात हे गट? भारतात असे आधार गट फारसे प्रचलित नसल्यामुळे कदाचित तुम्हालाच त्याची सुरुवात करावी लागेल. तुम्ही एखाद्या समस्येबराेबर सामना करत असाल किंवा त्यातून बाहेर आला असाल, तर इतर महिलांना मदतीसाठी तुम्ही असा गट सुरू शकता. एखाद्या तज्ज्ञालाही तुम्ही यात घेऊ शकता. मात्र, या गटात येण्यासाठी काेणावर जबरदस्ती करता येत नाही आणि तुमच्याकडे काेणी मदतीसाठी येईलच असे नसल्याचे लक्षात ठेवा.