देश 2070 पर्यंत कार्बनमु्नतकरणार : गडकरी

24 Mar 2023 15:46:00

carbon
पेट्राेल व डिझेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ हाेत असल्याने त्याला पर्यावरणपूरक इंधनाचा (ग्रीन फ्युएल) पर्याय देत 2070 पर्यंत देश कार्बनमुक्त करणार, असा संकल्प केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सी20 परिषदेच्या समाराेप प्रसंगी केला.हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सी-20 परिषदेतील मंथनाचा उपयाेग हाेईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.जी-20 अंतर्गत सी-20 परिषदेत विविध विषयांवर देश-विदेशातील प्रतिनिधींनी पर्यावरण, गरिबी आणि इतरही समस्यांवर मंथन केले. या परिषदेच्या समाराेपाला गडकरी, सी-20 समितीच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्यासह परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव अभय ठाकूर, सी 20 परिषदेचे संरक्षक डाॅ.विनय सहस्रबुद्धे, कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राच्या निवेदिता भिडे, विजय नंबियार आदी मान्यवर उपस्थित हाेते.
 
भारत आता जीवाश्म इंधनाच्या पर्यायी स्त्राेतांकडे, हरित इंधनाकडे वाटचाल करत आहे. बायाे-इथेनाॅल विविध स्त्राेतांपासून तयार केलजात आहे. सर्वाधिक प्रदूषण हे पेट्राेलवर धावणाऱ्या वाहनांपासून हाेत असल्याने पर्यायी इंधनाचा वापर करण्यावर भर दिला असून, इथेनाॅलवर चालणारी, बॅटरीवर चालणारी, विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्राेत्साहन दिले जात आहे, असे गडकरी यांनी सांगितले.देश 2070 पर्यंत कार्बनमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, भारतीय संदर्भात अंत्याेदय म्हणजे समाजातील शेवटच्या व्यक्तीचा उदय आणि विकास आपल्याला सुनिश्चित करायचा आहे. नैतिकता, अर्थव्यवस्था, पर्यावरण हे समाजाचे तीन स्तंभ आहेत, असे गडकरी म्हणाले. डाॅ. सहस्रबुद्धे व भिडे यांनी मनाेगत व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0