ताशी 750 किमी वेगाने उडणारी कार

    24-Mar-2023
Total Views |
 
 


Car
 
इटलीच्या एका डिझायनरने 4 बाय 4 जेट फ्लाइंग वाहनाचे डिझाईन तयार केले आहे.या डिझाईन कंपनीचे नाव पिअरपावलाे लाझरिनी असे आहे. या कंपनीने एक एअर कार तयार केली आहे. राेल्स राॅईसच्या जेट इंजिनाद्वारे संचालित ही एअर कार आकाशात उड्डाण करण्यासाठी सक्षम आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक काेंडीची समस्या दूर हाेण्याची श्नयता व्य्नत हाेत आहे.ही एअर कार (विमान) 6 मीटर लांब असून, त्यात एक पायलट आणि तीन प्रवासी प्रवास करू शकतात. या एअर कारची बाॅडी कार्बन फायबरची असल्यामुळे ती अल्ट्रालाईट आहे. प्रवाशांना ज्या रस्त्याने जायचे आहे, त्या दिशेला ही फ्लाइंग कार वळविता येते ही फ्लाईंग कार जेट इंधनावर चालते ही फ्लाइंग कार 3200 किलाेमीटर अंतर ताशी 750 किमी वेगाने उड्डाण करून पूर्ण करू शकते. ही फ्लाइंग कार 2024 मध्ये मार्केटमध्ये येणार आहे.