सीपीआरला आवश्यक वैद्यकीय सुविधा देणार; केसरकर यांची ग्वाही

    23-Mar-2023
Total Views |
 
 

medicine 
अंबाबाई मंदिर, जाेतिबा मंदिर, पंचगंगा नदी घाट परिसर विकास, तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वाेपचार रुग्णालयासह (सीपीआर) अन्य रुग्णालयांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा गतीने देऊन काेल्हापूरला प्राचीन काळापासून असणारे वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन काेल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.राजर्षी छत्रपती शाहूमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वाेपचार रुग्णालयात माॅड्युलर ओटी व बालराेग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमास राज्य नियाेजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील कुरुंदवाडे आदी उपस्थित हाेते.
 
सीपीआर रुग्णालय सुसज्ज व्हावे, यासाठी 38 काेटींचा नवीन आराखडा तयार केला असून, लवकरात लवकर त्याला मंजुरी देण्यात येईल. काेल्हापूरमध्ये उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे आसपासच्या जिल्ह्यांनाही फायदा झाला आहे. या माॅडयुलर ओ.टी. व बालराेग अतिदक्षता विभागाचा लाभ काेल्हापूरसह शेजारील जिल्ह्यातील गाेरगरीब रुग्णांना हाेईल. नजीकच्या काळात या रुग्णालयातसांधेराेपण, अवयव प्रत्याराेपण, काॅक्लिअर इंप्लांटसारख्या शस्त्रक्रियाही पार पडतील, असे केसरकर यांनी सांगितले. हे रुग्णालय राज्यातील अग्रेसर रुग्णालय हाेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करु या, असे आवाहन क्षीरसागर यांनी केले.