कान उघडून ऐका कानाचे इशारे

23 Mar 2023 16:25:12
 

Ears 
श्रवणक्षमता कमी असणे गंभीर आव्हान हाेत चालले आहे.जागतिक आराेग्य संघटनेनुसार सध्या जगात सुमारे 47 काेटी लाेक या समस्येने पीडित आहेत.अ‍ॅडव्हान्स टे्ननालाॅजी, स्मार्टफाेन, हाय पाॅवर म्युझिक सिस्टीम, ईअरफाेनचा वाढता वापर तसेच नाइट्नलबचा गाेंंगाट तरुणांमध्ये बहिरेपणाचे कारण हाेत आहे. मुलांमध्ये 60 ट्न्नयांपर्यंत बहिरेपणाची समस्या राेखता येऊ शकते. तसाही तीव्र गाेंगाटामुळे झालेल्या बहिरेपणाचा काेणताही उपचार उपलब्ध नसल्यामुळे सुरक्षा हाच एक उपाय आहे.आठ तासच 85
डेसिबल याेग्य : तीव्र आवाजामुळे कानाच्या अंतर्गत भागातील संवेदी पेशी क्षतिग्रस्त हाेतात आणि त्यांची कार्यप्रणाली प्रभावित हाेते. ज्यामुळे सुरुवातीला काही काळ ऐकू येणे कमी हाेते. दीर्घकाळपर्यंत सतत तीव्र आवाजाच्या संपर्कात राहिल्यास ही समस्या कायमची हाेते.ट्रॅफिकचा गाेंगाट, अलार्म घड्याळ, वाॅशिंग मशीन, साध्या गप्पा हे सारे 60 ते 80 डेसिबलच्या परिघात येते. 85 डेसिबलपेक्षा कमी आवाजही जास्तीत जास्त 8 तासचसुरक्षित मानला गेला आहे. माेटार सायकल वा ट्रकचा आवाज, एका अंतरावर ठेवलेली म्युझिक सिस्टीम 95 ते 100 डेसिबल परिघात येते.
किती काळपर्यंत संगीत ऐकणे याेग्य : माेबाइलवर बाेलताना वा म्युझिक ऐकण्यासाठी 60/60 च्या नियमाचे पालन करू शकता. दिवसात 60 मिनिटांपेक्षा जास्त कानाला लावून माेबाइलवर बाेलू नका. माेबाइलची जास्तीत जास्त तीव्रता 60 टक्के पेक्षा कमी ठेवा.
माेबाइल वा लॅपटाॅपवर गाणी वा एखादा व्हिडिओ ऐकण्यासाठी ईअरबड्स/प्लग वा हेडफाेन वापरले जातात. ईअरप्लग कानात लावले जातात. तर हेडफाेन कानाबाहेर लावतात. दाेन्हींमध्ये ईअरप्लग जास्त नुकसान करतात.
हाेऊ शकते इंफे्नशन : ईअरबडस काेठेही ठेवणे वा जमिनीवर पडल्यानंतर किंचित झटकून कानात घालणे बाह्य कानाच्या संक्रमणाचे एक कारण हाेऊ शकते.गाेंगाटाच्या जागी ईअरफाेनचा वापर करू नये. कारण असे झाल्यास बाहेरच्या आवाजापेक्षा आपण ईअरफाेनचा व्हाॅल्युम खूप वाढवताे जाे कानाच्या आराेग्यासाठी हानिकारक असताे. ड्राइव्ह करताना कानात हेडफाेन लावनू बाेलणे व रात्री ईअरफाेन लावून गाणे ऐकत झाेपणे चुकीचे आहे.गाेंगाटाच्या सतत संपर्काने कानाचे नुकसान हाेत असते.
हीसुद्धा कारणे आहेत : वय : वयानुसार बहिरेपणाची वेगवेगळी कारणे असू शकतात. जन्मजात समस्या, कानात संक्रमणाशिवाय वृद्धावस्थेत श्रवणसंबंधित नसा कमकुवत हाेणे हेही कारण असू शकते.
कान वाहणे : कान वाहणे एक सामान्य समस्या असून ती काेणत्याही वयाच्या लाेकांना हाेऊ शकते. यामुळे श्रवणक्षमताही प्रभावित हाेत असते. ही समस्या वेळीच बरी हाेऊ शकत
 
 
Powered By Sangraha 9.0