आपल्याला बेगडी जीवन हवे की खरेखुरे?

22 Mar 2023 14:47:02
 

happy 
 
जेव्हा आपण हसताे तेव्हा कळते, की ते खरे आहे की नकली. हास्य नकली असल्यास उत्तम व्हायब्रेशन येणार नाहीत. जेव्हा आत्म्याला पाेषण मिळणार नाही, तेव्हा ताे कमकुवत हाेईल आणि त्याला नकली गाेष्टींची जास्त गरज वाटू लागेल. जेव्हा आपल्याला आतून चांगले वाटणार नाही, तेव्हा आणखी जास्त वस्तू मिळवण्याची इच्छा हाेईल. उदा. महागड्या वस्तू खरेदी करूनच चांगले वाटणे.समजा आज आपल्या घरात पार्टी आहे. एखादे राेप काेमेजलेले दिसत असेल, तर ते कसेही करून सुंदर दिसावे यासाठी बाहेरून डेकाेरेट कराल. तेच दुसरीकडे एक गुलाबाचे फूल असेल ज्यावर काेणतेही डेकाेरेशन नसले तरी ते आपल्या खऱ्या साैंदर्याने, सुगंधाने सर्वांना आपल्याकडे आकर्षित करील. हा फरक असताे आपल्या असली आणि बेगडी जीवनात. आता हे आपल्यालाच ठरवायचे आहे की आपण आपल्यासाठी कसे जीवन इच्छिता.बेगडी की सुखा-समाधानाने भरलेले.
 
काही सवयी बदलून पाहा
 
1. आपले जीवन इतरांना नियंत्रित करू देऊ नका. तेच करा जे आपण करू इच्छित आहात, ज्यात आपला आनंद असेल. काहीही फक्त एवढ्यासाठीच करू नका, ज्यामुळे समाेरचा खुश हाेईल.
 
2. बदल करू इच्छित आहात तर एखाद्या खास दिवसाची वाट पाहू नका.जे काही करू इच्छित आहत ते आजच सुरू करा.
 
3. गडबडीत निर्णय घेऊ नका.काहीही नवे करण्यासाठी प्रथम त्याविषयी व्यवस्थित माहिती मिळवून घ्या. संतुष्ट झाल्यानंतरच नवे काम हाती घ्या.
 
4. प्रत्येक गाेष्टीसाठी नशिबाला जबाबदार धरू नका. जीवनात मुख्यत्वे दाेन गाेष्टी असतात ज्या पूर्णपणे आपल्यावर अवलंबून अतात. पहिली जी काही परिस्थिती आहे ती स्वत:च स्वीकारा. दुसरी जी परिस्थिती समाेर आहे ती बदलण्याची जबाबदारी घ्या.
 
Powered By Sangraha 9.0