माेतीबिंदू: कारणे व लक्षणे

    22-Mar-2023
Total Views |
 
 
 

eyes 
 
माेतीबिंदू म्हणजे डाेळ्यातील नेत्रमणी किंवा नैसर्गिक काचेसारखे भिंग अपारदर्शक बनणे. भिंगाचे पारदर्शकत्त्व कमी झाल्याने दृष्टी कमी हाेत जाते व डाेळ्यातील बाहुली काळीभाेर दिसण्याऐवजी करडी किंवा पांढरी दिसू लागते.
 
कारणे:- विशेषतः वृद्धत्त्वामुळे माेतीबिंदू हाेताे. याखेरीज शरीरातील काही ग्रंथींच्या स्त्रावाच्या अभावाने, अनुवंशिकतेमुळे, डाेळ्याच्याच काही राेगांमुळे, विषारी पदार्थ पाेटात गेल्याने, पंडुराेगामुळे आणि मधुमेहापुढे माेतीबिंदू हाेऊ शकताे.
 
लक्षणे : डाेळ्यासमाेर काळे ठिपके किंवा काेळ्याचे जाळे पसरल्याप्रमाणे दिसू लागते. वस्तूदुभंगल्याप्रमाणे दिसतात. दिव्याभाेवती वलय दिसते . चंद्र दाेन किंवा अनेक दिसतात. हळूहळू लांबचे दिसण्याचे कमी हाेते. अनेक रंग डाेळ्यासमाेर दिसू लागतात. चाळिसाव्या वर्षी चाळिशीचा चश्मा लागल्यावर काही वर्षाने चश्म्याशिवाय जवळचे दिसू लागते.