म्हाडाने घरांच्या प्रकल्पांना गती द्यावी

    22-Mar-2023
Total Views |
 
 

Mahada 
पुणे मंडळाच्या 3120 घरांच्या साेडतीवेळी उपमुख्यमंत्र्यांची सूचनाप्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे. त्यानुसार म्हाडाने घरांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.पुणे मंडळातर्फे म्हाडा गृहनिर्माण याेजना, 20 टक्के सर्वसमावेशक याेजना व प्रधानमंत्री आवास याेजना (शहरी) अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण याेजनेतील 3120 सदनिकांच्या ऑनलाइन साेडतीचा प्रारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आला.त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, पुणे मंडळाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील, ओव्हरसाइट समितीचे अध्यक्ष एम. एम.पाेतदार, उपायुक्त दीपक नलावडे, समिती सदस्य धनंजय कुलकर्णी उपस्थित हाेते.
 
राेजगारासाठी शहरी भागात नागरिक येतात.त्यांना माफक आणि परवडणाऱ्या किमतीतघर उपलब्ध करून देताना किमान साेयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी म्हाडाने आपल्या प्रकल्पांना गती द्यावी. तसेच, बांधकामाची गुणवत्ता राहील याची दक्षता घ्यावी.अधिकाधिक घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाने नियाेजन करत लवकरात लवकर घरांच्या साेडती काढाव्यात, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या 6058 सदनिकांसाठी 58467 अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नाेंदवला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यातील 2938 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या याेजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आल्या.आता 3120 सदनिकांसाठी 55845 अर्ज प्राप्त झाले आहेत.