चीन देशाचा वसंताेत्सव

    22-Mar-2023
Total Views |
 
 

China 
 
 
चीन देशांत वसंत उत्सवाची सुरुवात चिनी कॅलेंडरनुसार पहिल्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सुरू हाेते आणि याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी या उत्सवाचा समाराेप हाेताे.वसंताेत्सव केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. म्हणूनच अनेक देशात या वसंताेत्सवाला नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानण्यात येतं. या उत्सवाच्या पूर्वसंध्येला सर्व लाेक एकत्र येऊन जेवण करतात, आनंद व्यक्त करतात आणि सरत्या वर्षाला प्रेमाने निराेप देतात. चीन देशांत वसंत उत्सवाची सुरुवात चिनी कॅलेंडरनुसार पहिल्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सुरू हाेते आणि याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी या उत्सवाचा समाराेप हाेताे. या चिनी कॅलेंडरचा उदय काही शतकांपूर्वी झाला हाेता. यासाेबतच अनेक मिथकं आणि गाेष्टी त्यास जाेडल्या गेल्या आहेत. ज्यामुळे आपल्याला प्राचीन चिनी संस्कृतीविषयी माहिती मिळते.
 
या गाेष्टीनुसार एक राक्षस नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी येऊन पशु, पक्षी आणि लहान मुलांना पळवून नेत असे. स्वत:ची रक्षा करण्यासाठी गावातील सर्व लाेक आपल्या घराची दारं बंद करून दाराबाहेर अन्न ठेवत असत. हे जेवण जेवून ताे राक्षस तृप्त झाला आणि मग त्याने त्या गावातील लाेकांना त्रास दिला नाही. मात्र एकदा लाेकांनी पाहिलं की, एका लाल रंगाचे कपडे घातलेल्या लहान मुलाला पाहून ताे राक्षस घाबरला, तेव्हा लाेकांना कळालं की, राक्षस लाल रंगाच्या कपड्यांना घाबरताे. तेव्हापासून लाेक आपल्या घरावर लाल रंगाचा कंदील, झाडं आणि लाल रंगाचे फटाके वाजवू लागले, तेव्हापासून ताे राक्षस काही पुन्हा आला नाही.चीन देशांतच असा उत्सव साजरा केला जाताे जेव्हा काही लाखाे लाेक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. या दिवशी सर्वजण एकत्र येऊन जेवण घेण्याची जी प्रथा आहे ती प्रथा पाळण्याचा प्रयत्न करतात.
 
हा उत्सव पंधरा दिवस चालताे आणि या प्रत्येक दिवशी एक निराळी परंपरा पाळली जाते. पहिल्या दिवशी लाेक घरातील माेठ्यांच्या घरी जातात, त्यांचा आशीर्वाद घेतात. जे विवाहित आहेत ते लहान मुलांना लाल पाकिटात घालून भेटवस्तू किंवा पैसे देतात. यावेळी माेठ्या आवाजाचे फटाके वाजवले जातात. यावेळी कुत्र्यांना खाऊ घातलं जातं.सर्व कुत्र्यांचा जन्म याच वेळी झाला हाेता असं मानलं जातं. या दिवशी पूर्वजांची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी नातेवाईकांना आणि मित्रांना जवळच्या लाेकांना भेटण्यासाठी वेळ ठेवली जाते. पाचव्या दिवशी संपत्ती देवतेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाताे. या दिवशी फटाके वाजवून संपत्ती देवीला आकर्षित केलं जातं. सातव्या दिवशी कच्चा मासा सलाडच्या रुपात खाण्याची पद्धत आहे. आठव्या दिवशी जेड सम्राटच्या जन्मदिवशी पुन्हा सर्व लाेक एकत्र येऊन एकत्र भाेजन करतात. अशा प्रकारे एकूण पंधरा दिवस हा उत्सव साजरा केला जाताे.