निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय अ‍ॅमस्टरडॅम

    22-Mar-2023
Total Views |
 
 


Amerstdam 
 
अ‍ॅमस्टरडॅमही नेदरलँड्सची राजधानी आहे. आणि हे या देशातलं सर्वांत माेठं शहर आहे. अ‍ॅम्सटेल नावाची नदी ही या शहाराच्या मधाेमध वाहते. या नदीमुळेच या शहराचं नावं असं ठेवण्यात आलं असावं. हे शहर इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीनेसुद्धा खूप माेठं शहर आहे. जगभरातून हजाराे पर्यटक दरवर्षी इथे येत असतात. इथं जगातले खूप उत्तम अशी कलासंग्रहालय आहेत. ती पाहण्यासाठी इथं नेहमी खूप गर्दी असते. तसं पाहता युराेपच्या इतर शहरांप्रमाणेच हे शहरसुद्धा खूप गर्दी असणारं शहर आहे. 700 वर्षांपासून इथं ज्या व्यवस्था आहेत त्या आजही तशाच आहेत. त्यामुळे हे शहर कुठेही अस्ताव्यस्त जाणवत नाही.इथं आजही खूप जुन्या शैलीची घरं पाहायला मिळतात. इथं जेवणाचीसुद्धा एक परंपरा आहे. ही राजधानी सुद्धा नुसती नावालाच आहे. कारण सरकारी मुख्यालय इथं नसून हेग इथं आहे.
 
या शहरात एकून 1300 पूल असून इथं सर्व ठिकाणी मेट्राे सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत. मात्र इथं 20% लाेक सायकलवर सर्व प्रवास करतात. इथं वसंत ऋतूत ट्युलिप फुलं फुलतात.त्याशिवाय नेदरलँड्सची कल्पनाच करता येऊ शकत नाही. जवळपास 80% ट्युलिप फुलांचं उत्पादन नेदरलँड्स इथं हाेतं. इथं राॅयल पॅलेससारखं माेठं स्मारक आहे. इथं 100 पेक्षा जास्त आर्ट गॅलरीज आहे.हे शहर खेळांसाठी सुद्धा प्रसिध्द आहे. इथं 40 स्पाेर्ट्स क्लब असून सर्वच खेळांसाठी एक क्लब इथं आहे. हे शहर ऑलिंपिक शहर म्हणून ओळखलं जात असलं तरी इथंसुद्धा लाेकांना फुटबाॅल खूप आवडताे. इथं अनेक जगप्रसिद्ध स्टेडियम आहेत.ज्यांना मध्ययुगीन आणि प्राचीन कलांमध्ये रस आहे, अशांसाठी हे शहर म्हणजे एक पर्वणीच आहे. इथं 40 वस्तु संग्रहालये असून ही 17 व्या शतकात बांधण्यात आली हाेती. इथं असणारं वॅन गाॅग हे संग्रहालय वॅन गाॅग यांना समर्पित आहे. यामुळे आजही हे शहर पर्यटकांसाठी खूप महत्त्वाचं ठिकाण आहे.