आत्तापासूनच सुरू करा स्ट्राेकपासून वाचण्याचे उपाय

    21-Mar-2023
Total Views |
 
 

stroke 
 
पूर्वी स्ट्राेक (ब्रेन अ‍ॅटॅक)च्या केसेस सामान्यत: साठीनंतर समाेर येत असत पण आता तरुणवर्ग (तिशीपस्तिशीतील)ही यातून सुटलेला नाही.या समस्येचे मूळ कारण राेगट जीवनशैली व चुकीचे खाणे-पिणे आहे. तरुणांची अतिमहत्वाकांक्षा व नंतर या अपेक्षा पूर्ण न हाेणेही मानसिक आराेग्यावर परिणाम करीत आहे. त्यात उच्च रक्तदाब व डिप्रेशन दीर्घकाळ राहणे नंतर स्ट्राेकचा धाेका वाढवते. हाय काेलेस्ट्राॅल, धूम्रपान व जास्त प्रमाणात मद्यपान, मीठ व रिफाइंड पदार्थ जास्त खाणे हा धाेका आणखी वाढवतात.याशिवाय हाय बीपी, लठ्ठपणा व दीर्घकाळपासून किडनी राेगांशी झुंजणाऱ्यांनी विशेषकरून आपली जीवनशैली सुधारण्याची गरज आहे.
 
स्ट्राेकच्या उपचारात सुरुवातीचा काळ अत्यंत महत्त्वाचा असताे. यामुळेच वर्ल्ड स्ट्राेक ऑर्गेनायझेशनने स्ट्राेकसाठी या वर्षाची थीम ‘ प्रेशियस टाइम’ ठेवली आहे.स्ट्राेकची लक्षणे समाेर येताच व्यक्तीला सर्वसाेयींनी युक्त हाॅस्पिटलमध्ये नेणे आवश्यक आहे. जिथे सीटी स्कॅन, कॅथ लॅबच्यासेटअपसाेबत न्यूराेसर्जनही हवेत.स्ट्राेक आणि त्याचे प्रकार स्ट्राेक अशी आणीबाणीची मेडिकल स्थिती असते, ज्यात धमण्यांमध्ये रक्तपुरवठा अचानक थांबला जाताे वा धमणी वा रक्तवाहिनी फाटते. मेंदूला रक्ताचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे ऑ्नसीजन मिळू शकत नाही.ज्यामुळे मेंदूच्या न्यूराॅन्स मृत हाेऊ लागतात आणि रुग्ण ‘काेमा‘त जाताे.
 
 इस्केमिक स्ट्राेकमध्ये मेंदूच्या धमण्यांमध्ये अचानक रक्तपुरवठा थांबला जाताे. ही स्थिती एक तासाहून जास्त काळ चालू राहू शकते. अशा स्थितीत मेंदूची कार्यप्रणाली ठप्प हाेऊ लागते.
 
 हेमाॅरेजिक स्ट्राेकला ब्रेन हॅमरेजही म्हणतात. यात ेंदूची रक्तवाहिनी फुटते. रुग्ण बेशुद्ध हाेताे व त्याचा लकवाग्रस्त हाेण्याचा धाेका वाढताे.
 
 ट्रांजियंट इस्केमिक अ‍ॅटॅक (टीआयए) मध्ये मेंदूच्या धमण्यांमध्ये रक्तसंचार अचानक काही काळासाठी बाधित हाेऊ शकताे. व्यक्ती असामान्य व असहज जाणवते.तशी एक तासानंतर ही लक्षणे आपाेआप दूर हाेतात, पण टीआयए धाे्नयाची घंटा आहे कारण आगामी 48 तासांदरम्यान याचा पुन्हा अ‍ॅटॅक येण्याची श्नयता असते.
 
 इस्केमिक स्ट्राेकच्या सुमारे 85% आणि हॅमेरेजिक स्ट्राेकच्या सुमारे 15% केसेस समाेर येतात.जीवनरक्षक सुरुवातीचे 4 तास स्ट्राेकने पीडित व्यक्तीला जर साडेचार तासांत व अनेक विशेषज्ञांच्या मते तीन तासांत सुयाेग्य वैद्यकीय साेय उपलब्ध झाली तर या काळाला मेडिकल भाषेत गाेल्डन अवर्स म्हटले जाते. गाेल्डन अवर्समध्ये उपलब्ध हाेणाऱ्या उपचाराने रुग्णाचा जीव वाचू शकताे. साेबतच स्ट्राेकचे दुष्परिणाम आणि गुंता बऱ्याच प्रमाणात कमी व नियंत्रित करता येऊ शकताे.प्रथम टेस्ट तरच हाेईल याेग्य उपचार
 
 औषधे व इंजे्नशन : याद्वारे मेंदूच्या भागातील गुठळ्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाताे.
 
 मेकॅनिकल थाॅम्बे्नटॅमी : इस्केमिक स्ट्राेकचा हा आधुनिक व खूप उपयुक्त उपचार आहे. यात एक ‘कॅथेटर’ टाकून रक्ताच्या गुठळ्या हटवतात आणि मेंदूच्या धमण्यांमध्ये आलेला अडथळा दूर करतात.