वैवाहिक नात्यासाठी समुपदेशन उपयु्नत ठरते

    21-Mar-2023
Total Views |
 
 

Marriage 
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असताे. त्यामुळे जाेडप्यांना एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी; तसेच वैवाहिक जीवन सुरळीत राहण्यासाठी विवाह समुपदेशनाची खूप मदत हाेऊ शकते.या समुपदेशनाद्वारे जाेडप्याला त्यांच्यातील मतभेद-वाद साेडविण्यासाठी समुपदेशक मदत करतात. याचा ायदा त्यांचं नातं सुधारण्यासाठी हाेताे. लग्न करताना ज्या गाेष्टी उघडपणे बाेलणं आवश्यक असतं तेच बाेलणं टाळण्याचा काही जाेडपी प्रयत्न करतात. अशा गाेष्टी किंवा समस्या मनमाेकळेपणानं मांडायला विवाह समुपदेशक एक वेगळी दिशा देतात. भिन्न लैंगिक प्रवृत्तीच्या जाेडप्यांसाठी विवाह समुपदेशन परिणामकारक ठरतं. केवळ विवाहित जाेडपीच नाही, तर लग्न करण्यास इच्छुक असणाऱ्या व्य्नतीही समुपदेशनाची मदत घेऊ शकतात.
 
संसार म्हटले की भांड्याला भांडे लागणार, असे समजून वडीलधाऱ्या मंडळींकडून नवदांपत्यांच्या वैवाहिक संघर्षाकडे दुर्लक्ष हाेते. त्यामुळे पती-पत्नीतील वैवाहिक संघर्ष अधिकच वाढीस लागतात. प्रेमविवाहामध्ये बऱ्याच वेळा प्रेम आंधळे असते, याचा प्रत्यय येताे.
त्यांच्यात किरकाेळ गाेष्टींवरूनही खटके उडायला लागतात. प्रेमविवाहानंतर बऱ्याच वेळा नवीन घराेबा केला जाताे. अशावेळी पती-पत्नींमध्ये संघर्ष उद्भवल्यास वडीलधाऱ्या व्य्नतींचे मार्गदर्शन मिळू शकत नाही. त्यामुळे पती-पत्नींच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण हाेताे. शेवटी त्यांच्यामध्ये घटस्ाेटाची मानसिक तयारी हाेते. त्यामुळे बरेचसे प्रेमविवाह अयशस्वी ठरतात.
 
पती-पत्नींचे स्वभावदाेष बऱ्याच वेळा वैवाहिक संघर्षाला कारणीभूत ठरतात. वेगवेगळे स्वभाव असलेल्या व्य्नती पती-पत्नी म्हणून यशस्वी संसार करतात परंतस्वभावदाेष संघर्षाची ठिणगी उडवायला कारणीभूत ठरतात. जाेडीदाराचा संशयी स्वभाव बऱ्याच वेळा वाद उत्पन्न करताे. विनाकारण जाेडीदाराबद्दल संशय व्य्नत केल्यास जाेडीदार दुखावला जाताे. बऱ्याच वेळा हा संशय जाेडीदाराच्या चारित्र्याबद्दलचा असताे. जाेडीदाराने संशय व्य्नत केल्यानंतर भांडणाला ताेंड ुटते. त्यामुळे वैवाहिक संघर्ष वाढीस लागताे.पती-पत्नी म्हणून वैवाहिक नात्यात एकमेकांना जास्तीत जास्त समजावून घेणे मर्हंत्त्वाचे ठरते.
 
अनेकदा हे समजावून घेण्यासाठी समुपदेशनाचा उपयाेग हाेताे. बऱ्याच जणांना समुपदेशनाविषयी पुरेशी माहिती नसल्याने समुपदेशनासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे वैवाहिक नाते घट्ट समृद्ध आणि चिंतन टिकणारे असावे, असे वाटत असेल तर गरज पडेल तेव्हा समुपदेशकांकडे जाणे याेग्य ठरते.समुपदेशनाचे ायदे चांगला संवाद हाेताे. विवाहपूर्व आणि विवाहानंतरही समुपदेशनाचा मूळ हेतू हाच आहे की, दाेन व्य्नतींचा नीट संवाद व्हावा. कारण दाेन्ही व्य्नती एकमेकांना अनाेळखी असतात. स्वभाव नीट माहीत नसताे.त्यामुळे त्यांच्यामध्ये उत्तम संवाद झाला, तर स्वभावाचे पदर उलगडायला मदत हाेते.