इस्तंबूलमधील सहा मनाेऱ्यांची निळी मशीद

    18-Mar-2023
Total Views |
 
 

Istanbul 
 
तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरात सुलतान अहमद वा निळी मशीद नावाची ऐतिहासिक मशीद आहे. याची निर्मिती इ.स. 1609 ते 1616 दरम्यान झाली. मशिदीच्या आतील भिंतींचा रंग निळा असल्यामुळे याला निळी वा ब्ल्यू मशीद म्हणतात.सामान्यत: काेणत्याही मशिदीला चार मनाेरे असतात पण या मशिदीला सहा मनाेरे आहेत. तशी सहा मनाेरे बांधण्याची याेजना नव्हती. केवळ गैरसमजापाेटी असे झाले. या मशिदीत सुमारे 5 मुख्य व 8 सामान्य घुमट आहेत. यातील सर्वांत माेठ्या घुमटाचा व्यास सुमारे 23.50 मीटर असून उंची सुमारे 43 मीटर आहे. मशिदीच्या मधाेमध असलेल्या या घुमटाच्या चारी बाजूंना प्रकाश आत येण्यासाठी 28 खिडक्या आहेत.मशिदीच्या आत अनेक दिवे रत्नजडित साेन्याने कव्हर केलेले हाेते.
 
नंतर ते हटवून संग्रहालयात ठेवले आहेत. या घुमटांमध्ये माैल्यवान दगड लावले असून त्यावर प्रार्थना काेरलेल्या आहेत.मशिदीच्या वास्तुकलेचे वैशिष्ट्य म्हणजे जुम्मेच्या नमाजाच्या वेळी इमाम जेव्हा खुत्बा देण्यासाठी उभे राहतात तेव्हा मशिदीच्या प्रत्येक काेपऱ्यातून आणि जागेवरून इमामना सहज पाहता व ऐकता येते. मशिदीत एकावेळी दहा हजार लाेक नमाजात सामील हाेऊ शकतात.मशिदीच्या मुख्य हाॅलमध्ये अनेक घुमट आहेत. ज्यामध्ये एक मध्यवर्ती घुमट आहे.याचा व्यास 33 मीटर आणि उंची 43 मीटर आहे. मशिदीच्या आतील भागाच्या भिंतीत हाताने तयार केलेल्या 20 हजारांपेक्षा जास्त टाइल्स वापरल्या गेल्या आहेत. ज्या अंतरंग सुंदर बनवतात. मशिदीत नैसर्गिक प्रकाशासाठी काचेच्या दाेनशेहून जास्त खिडक्या तयार केल्या आहेत.