भेट अशी द्या, जी कर्तृत्वाची आठवण करून देईल!

14 Mar 2023 16:35:35
 


gift
 
वाढदिवस, लग्न किंवा काेणत्याही सणानिमित्ताने काेणाला काेणते गिफ्ट द्यायचे, असे प्रश्न अनेकदा पडतात. ही गाेष्ट बहुतांश लाेकांना त्रास देते. काेणाला काय द्यायचे, हे तुम्हाला समजत नसेल, तर ती बाब साेपी नाही, हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे. भेटवस्तू देणे हे एक शास्त्र आहे. भेटवस्तूंचा नातेसंबंधांवर खाेलवर परिणाम हाेताे, असे व्हर्जिनिया विद्यापीठातील मार्केटिंगच्या प्राध्यापिका ज्युलियन गिवी म्हणतात. दूर असलेल्या लाेकांना भेटवस्तूजवळ आणते. भेटवस्तूंची बाजारपेठ ही हजाराे काेटींची आहे. भेटवस्तू देण्यासाठी त्यांनी 6 वैज्ञानिक टिप्स दिल्या आहेत.
 
1) हृदयाला स्पर्श करणारी भेटवस्तू द्या : लाेकांना त्यांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या भेटवस्तू द्या. त्या भेटवस्तू ते कायम साेबत ठेवतील.वापरल्यानंतर फेकून दिली जाईल, अशी वस्तू कधीच देऊ नका. जर्नल ऑफ कंझ्युमर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशाेधनानुसार, लाेकांना भेटवस्तू हव्या आहेत, ज्या त्यांना नातेसंबंधाची आठवण करून देतात. यासाठी उदाहरण म्हणून त्यांनी दाेघांचे एकत्र चित्र, अल्बम याचा उल्लेख केला आहे. यामध्ये दाेघांच्या आठवणी असल्याने ते कायमस्वरूपी साेबत राहील, असा त्यांचा दावा आहे.
 
2) एखाद्या कामगिरीचे स्मरण करणाऱ्या भेटवस्तू : भेटवस्तू देण्याच्या विज्ञानावर संशाेधन करणारे वाॅशिंग्टन विद्यापीठातील मार्केटिंगचे प्राध्यापक राॅबिन लेबाॅफ म्हणतात की, काहीतरी आठवण करून देणारी भेटवस्तू द्यावी. अशी भेट ती व्य्नती आयुष्यभर आपल्याजवळ ठेवते. ते म्हणतात की, रेस्टाॅरंट कूपन ही चांगली भेटवस्तू नाही.
 
3) अनुभव निर्माण करणारी भेटवस्तू द्या : नवीन अनुभव देणारी भेटवस्तू आयुष्यभर टिकते, असे अँडरसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या प्राध्यापक कॅसी माॅजीलनर हाेम्स म्हणतात. एखाद्या टूरचे तिकीट किंवा गिर्याराेहण शिबिरात जाण्यासाठीचे तिकीट अशी भेटवस्तू द्या. मात्र यासाठी अट एवढीच आहे की, ज्याला भेटवस्तू दिली जात आहे, त्याच्यासाठी हा अनुभव पहिला असावा.
 
4) भेटवस्तू देताना स्वार्थी हाेऊ नका : जेव्हा तुम्ही एखाद्या खास व्य्नतीला भेटवस्तू देता, तेव्हा तुम्ही स्वार्थी हाेऊ नका. एखादी गाेष्ट जी तुमच्याकडे आहे आणि ती त्यालाही आवडते, अशी भेटवस्तू न्नकी द्या. ज्याला तुम्ही भेटवस्तू देणार आहात, ती कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वाेत्तम भेटवस्तूंपैकी एक असू शकते. हे जुने घड्याळ किंवा शर्टदेखील असू शकते.
 
5) गाेष्टी साेप्या करा : कधीकधी आपल्याला अनेक लाेकांसाठी भेटवस्तू घ्याव्या लागतात. लेबाॅफ यांनी याकरिता दाेन मार्ग सुचवले आहेत. प्रथम, साधी असली तरी प्रत्येकाला ती आवडेल अशी काहीतरी भेटवस्तू मिळवा आणि ती द्या. दुसरा मार्ग म्हणजे प्रत्येकाला आवडेल, अशी भेटवस्तू आधीच निवडून ठेवा आणि ती द्या; परंतु प्रत्येकाला वेगवेगळ्या भेटवस्तू द्याव्या लागतात म्हणून असे केलेच पाहिजे असेदेखील नव्हे, असे लेबाॅफ यांनी सांगितले आहे.
 
6) काेणावरही तुमची प्राधान्ये जबरदस्तीने लादू नका : भेटवस्तू देताना तुमची प्राधान्ये इतरांवर लादणार नाहीत, याची काळजी घ्या, असे लेबाॅफ म्हणतात.
Powered By Sangraha 9.0