‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’तून गुणवत्तेचे काैतुक

13 Mar 2023 15:10:52
 
 

school 
 
गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ या पुस्तकात राज्यातील शिक्षक आणि शाळांतील नाविन्यपूर्ण यशकथांचा समावेश करण्यात आला आहे. या यशकथांमधून इतर शिक्षक आणि शाळांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षक आणि शाळांचे त्यांनी काैतुक केले.केसरकर यांच्या हस्ते गुणी शिक्षक, गुणवंत शाळा या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.राज्यातील 65639 शासकीय शाळांतील हजाराे शिक्षक उत्तम शैक्षणिक कामगिरी करत आहेत.
 
मात्र, प्रातिनिधिक स्वरूपात मुंबई उपनगरांतील एक महापालिका शाळा आणिउर्वरित 34 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे एकूण 35 लेख या पुस्तकात संकलित केले आहेत. शाळेतूनच आपले मूल गुणवंत हाेऊन बाहेर पडेल, या विश्वासाने पालक आपले मूल शिक्षकांच्या हाती साेपवतात.पालकांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शिक्षकही सातत्याने प्रयत्न करतात. त्यांची ही धडपड म्हणजेच गुणवत्तेकडे वाटचाल करणारा त्यांचा खडतर प्रवास आहे. हा प्रवास शिक्षकांनी आपल्याच शब्दांत या लेखांत मांडला आहे.असंख्य नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याच्या कानाकाेपऱ्यातील शाळांत सुरू आहेत.यामुळे शासकीय शाळांना चांगला लाेकसहभागही मिळत आहे. गुणवत्तेचे सार्वत्रिकीकरण यातून अपेक्षित आहे, असे पगारे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0