याेग्यवेळी माैन राखणे हिताचे ठरत असते

    08-Feb-2023
Total Views |
 

silence 
 
संवाद साधला की आपाेआप मन माेकळे हाेते असे म्हणतात.काही प्रश्नांची उत्तरे ही फ्नत संवाद साधल्याने, काेणाशी तरी स्पष्टपणे बाेलल्यानेच मिळत असतात. साहजिकच जे काही आपल्या मनात येते, ते बाेलले पाहिजे आणि मनावरील ताण हलका केला पाहिजे, हा सर्वाेत्तम उपाय म्हणून सुचवला जाताे. मात्र, प्रत्येकवळी ताे उपाय कामी येताेच असे नाही. उलट काहीवेळा तर आपण माैन राखणे, हेच आवश्यक आणि उपयु्नत ठरते.लाेकांशी संवादामुळे जसे मन माेकळे किंवा हलके हाेते, तसेच याेग्यवेळी माैन राखल्याने ताण वाढत नाही, हा एक साेपा तर्क सांगितला जाताे. हे माैन केव्हा राखले पाहिजे, याचेही काही आडाखे ज्येष्ठ मंडळी सांगतात.अनेकांचे सांगणे असे असते की, याेग्यवेळी गप्प राहणे फायदेशीर ठरते.बाेलल्यामुळे ताण निर्माण हाेऊ शकताे, अशा काही प्रसंगांमध्ये माैन पाळायला हवे. कारण त्यामुळे ताण निर्माण हाेण्याची परिस्थितीच आपण टाळू शकताे. अर्थात, हे माैन कधी साधले पाहिजे, याचे काही संकेत असतात, तेही लक्षात घेतले पाहिजेत.