टी-80 युद्धनाैकेचे दुर्गाडी किल्ला खाडीकिनारी आगमन

    08-Feb-2023
Total Views |
 
 

T-80 
कल्याण-डाेंबिवली पालिकेच्या नाैदल संग्रहालयात हाेणार दाखल, स्मारकाचा प्रस्ताव कल्याणडाेंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दुर्गाडी किल्ला खाडी किनारी नाैदल संग्रहालय उभारण्यात येत आहे. या संग्रहालयात नाैदल सामर्थ्याचे दर्शन घडवण्यासाठी नाैदलातर्फे टी-80 ही युद्धनाैका स्मारक म्हणून जतन करण्यात येणार आहे. मुंबईतील कुलाब्यातील नाैदलाच्या तळावरून दाेन दिवसांचा प्रवास करून कल्याणच्या दुर्गाडी किल्ला खाडी किनारी या युद्धनाैकेचे आगमन झाले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवस्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना कल्याणमध्ये केली. महाराजांच्या दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष म्हणून कल्याणच्या खाडी किनारी शिवकाळापासून ते आतापर्यंतच्या आरमाराचे दर्शन घडवविजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून दुर्गाडी खाडी किनारी नाैदल संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीकडून या प्रकल्पाची आखणी, नियाेजन आणि निधी खर्च केला जाणार आहे.
 
या निमित्ताने नाैदलाचे सामर्थ्य आणि शक्ती नागरिकांना कळावी म्हणून या संग्रहालयाच्या निमित्ताने युद्धनाैकेचे स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली. नाैदल अधिकाऱ्यांनी पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गेल्या वर्षी नाेव्हेंबरमध्ये पालिका आणि नाैदलात टी-80 युद्धनाैकसंग्रहालयातील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून पालिकेला हस्तांतरित करण्याचा सामंजस्य करार झाला. पालिकेचे आयुक्त डाॅ.भाऊसाहेब दांगडे, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद राेडे, प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा, माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी नाैदल अधिकारी रिअर अ‍ॅडमिरल ए. एन.प्रमाेद, कमांडर जिलेट काेशी यांच्याकडून कुलाब्यातील नाैदल तळावर टी-80 युद्धनाैकेचा ताबा घेतला. दाेन दिवसांचा प्रवास करून ही युद्धनाैका नुकतीच दुर्गाडी खाडी किनारी विसावली.