काेकण लाेककला महामंडळ स्थापन करणार

    08-Feb-2023
Total Views |
 
 

Kokan 
 
चिपळूण महाेत्सवाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती काेकणात लाेककलेची समृद्ध परंपरा असून, पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत.यासाठीच काेकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापनेचा शासनाने निर्णय घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण काेकणाचा कायापालट हाेऊ शकताे. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल. तसेच, काेकणातील लाेककला वृद्धिंगत करण्यासाठी लाेककला महामंडळ स्थापन करण्यास शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेयेथील श्रीजुना कालभैरव मैदानावर पर्यटन, लाेककला, सांस्कृतिक व खाद्य महाेत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते.
 
कार्यक्रमस्थळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री शेखर निकम, प्रसाद लाड, याेगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह, जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक तथा संयाेजन समितीचे अध्यक्ष तानाजी चाेरगे, लाेकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, लाेककलावंत प्रभाकर माेरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डाॅ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित हाेते. खाद्य महाेत्सवांतर्गत काेकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे स्टाॅल उभारण्यात आले आहेत. काेकणातील विविध लाेककला सादर हाेणार आहेत. काेकणाच्या मातीतील लाेककला सादर केल्या जात आहेत.सिंधुदुर्गातील दशावतार, चित्रकथी, रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजाे, संकासूर, रायगड जिल्ह्यातील काेळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा 40 पेक्षा अधिक लाेककला सादर केल्या जात आहेत.