काळाघाेडा महाेत्सवाला केसरकर यांची भेट

    08-Feb-2023
Total Views |
 
 
 
Kalaghoda
 
कलाप्रेमींसाठी मेजवानी : विविध कलाप्रकारांच्या रसास्वादाची संधी मुंबईतील कलाप्रेमींसाठी संगीत, नाट्य आणि कलेची मेजवानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळाघाेडा कला महाेत्सवाला सुरुवात झाली असून, या महाेत्सवाला मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी काळाघाेडा आर्ट असाेसिएशनचे पदाधिकारी उपस्थित हाेते.या महाेत्सवात नृत्य, संगीत, व्हिज्युअल आर्ट्स थिएटर, साहित्य, खाद्य, बालसाहित्य आणि कार्यशाळा, सिनेमा, हेरिटेज वाॅक, स्टँड अप काॅमेडी, स्ट्रीट आर्ट, शहरी डिझाईन आणि आर्किटेक्चर, व्हिज्युअल आर्ट्स अशा विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.
 
फाेर्ट आणि चर्चगेट परिसरातील रॅम्पर्ट राेड, क्राॅस मैदान, कूपरेज बँडस्टँड, म्युझियम गार्डन हा महाेत्सव हाेत आहे. दाेन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा पुन्हा कलाप्रेमींसाठी ही पर्वणी उपलब्ध हाेत आहे. हा महाेत्सव 12 फेब्रुवारीपर्यंत कला रसिकांसाठी खुला राहणार आहे. केसरकर यांनी या महाेत्सवाची पाहणी करून आढावा घेतला.आवश्यक त्या साेयीसुविधांकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना करून त्यांनी कलाकांराचे अभिनंदन केले.