कबड्डी चषक महाेत्सवात भैरवनाथ कबड्डी संघ झाप विजेता

    08-Feb-2023
Total Views |
 
 
 
Kabaddi
श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ वावेच्या वतीने स्व. गणेशदादा यादव स्मृती 32 वा कबड्डी चषक महाेत्सव नुकताच उत्साहपूर्वक संपन्न झाला. भैरवनाथ कबड्डी संघ, झापने प्रतिस्पर्धी स्वयंभू हनुमान संघ चिपेवर अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.या कबड्डी महाेत्सवाचे उद्घाटन रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राजेश मापारा यांच्या हस्ते झाले. यावेळी पालीच्या नगराध्यक्षा प्रणाली शेळके, राष्ट्रीय पंच भगवान शिंदे, अनुपम कुलकर्णी, रवी शेठ, देशमुख, संदीप दपके इ. मान्यवर उपस्थित हाेते. क्रीडा महाेत्सवाचे औचित्य साधून आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील यशस्वी तरुण-तरुणींचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.
 
त्यात बीई., मेकॅनिकल, इन्कमटॅ्नस असिस्टंट स्नेहा म्हस्के, इले्निट्रक इंजिनीअर अक्षय शिंदे, मेरीलाईन हाॅस्पिटिलीटीचे संदेश म्हस्के, इले्निट्रक आणि टेलिकम्युनिकेशन्स इंजिनीअर अश्विनी शिंदे, कास्ट मॅनेजमेंट, अकाउंट्स शुभम म्हस्के इस्ट्रूमेंट इंजिनीअर साैरभ म्हस्के, काॅम्प्युटर सायन्स इंजिनीअर प्रणय म्हस्के आणि नेपाळ येथील स्पर्धेत राैप्य पदकासहित देशातही अनेक पदके मिळविणारी 7 व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रीशा म्हस्केचा समावेश आहे.प्रवीण खाडे, सुनील म्हस्के, मधुकर कारंडे व पंढरीनाथ म्हस्के यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले.
 
त्यात भैरवनाथ क्रीडा मंडळ, झाप (प्रथम क्रमांक) स्वयंभू हनुमान क्रीडा मंडळ, चिवे (द्वितीय क्रमांक) ओमभैरव क्रीडा मंडळ, आपटवणे (तृतीय क्रमांक) जय हनुमान क्रीडा मंडळ, रासळ (चतुर्थ क्रमांक) यांचा समावेश हाेता. सुमित माेरे, मालिका वीर यश सीतापराव, प्रणय तेलंगे, शुभम दळवी यांना वैय्नितक पुरस्कार देण्यात आले.कबड्डी महाेत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा महाेत्सव समिती, वावे ग्रामस्थ तसेच अध्यक्ष म्हस्के कार्याध्यक्ष केतन म्हस्के, खजिनदार कल्पेश म्हस्के, उपाध्यक्ष रमेश हिरडेकर, चिटणीस उमेश म्हस्के, सचिव धनंजय म्हस्के सहखजिनदार जगदीश म्हस्के आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक उमेश म्हस्के यांनी केले. निवेदन व समालाेचन केतन म्हस्के यांनी केले