नाेकरी शाेधताना फ्नत वेतनाकडे पाहू नका

    08-Feb-2023
Total Views |
 
 
 
Job
आपण अर्ज करत असलेल्या कंपनी अथवा संस्थेची आर्थिक स्थिती तपासासंध्यानंद.काॅम जगण्यासाठी राेजगार शाेधावा लागताे. ताे स्वयंराेजगार असाे किंवा नाेकरी. नियाे्नते त्यांना आवश्यक असलेल्या कामांसाठी जाहिराती देतात आणि याेग्य प्रक्रियेनंतर कर्मचारी निवडले जातात. नाेकरी शाेधताना बहुसंख्यांचे लक्ष असते वेतनाकडे. आपल्याला दरमहा किती पगार मिळेल, याची उत्सुकता असणे साहजिक असले, तरी केवळ तेच पाहून चालत नाही. आपल्याला काय काम करावे लागणार आहे, आपल्यावर काय जबाबदाऱ्या असतील, बदलीची श्नयता आहे का, ती काेठे हाेईल, आदींची माहितीसुद्धा आपल्याला असायला हवी; पण अनेक लाेक नाेकरी मिळाल्याच्या आनंदात काही बाबींकडे दुर्लक्ष करतात. असे करू नका. तज्ज्ञांचा सल्ला काय आहे ते बघा.
जीवनात अनेक संघर्षांना सामाेरे गेल्यावर किरण या तरुणीला चांगली नाेकरी मिळाली. तिच्या अपेक्षेपेक्षा नाेकरीतील वेतन खूप जास्त असल्यामुळे ती खूश हाेती. मात्र, आता ही नाेकरी साेडून देण्याची वेळ तिच्यावर आली आहे.कारण काय? एकाव्यावसायिक सामाजिक कार्य संस्थेत किरण वर्षभर प्रशिक्षण घेत हाेती. त्याचे फळ म्हणजे, तिला एका परदेशी संस्थेत प्लेसमेंट मिळाली. या कंपनीच्या कार्यशैलीनुसार किरणने वर्षातील काही महिने एखाद्या गावात राहून तेथील लाेकांना सुशिक्षित करावयाचे हाेते; पण काेणत्या गावात जावयाचे, याची तिला माहिती दिली नाही आणि नाेकरीत रुजू झाल्याचे जाॅयनिंग लेटरही तिला दिले गेले नाही; पण पगार चांगला असल्यामुळे किरणने त्याचा जास्त विचार केला नाही पण गावात जाण्याची वेळ आल्यावर काय झाले? किरणला ज्या गावी जावयाचे हाेते, ते दुर्गम आणि अगदी कमी लाेकसंख्येचे हाेते.
गावाभाेवती जंगल हाेते. गावात किरणला एकटेच राहावयाचे हाेते. प्रारंभी काही अडचणी आल्या आणि नंतर त्या वाढत गेल्या.त्यानंतर दाेन महिन्यांनी किरणचे जाॅयनिंग लेटर आले आणि ते एवढ्या उशिरा का दिले गेले, हे तिला समजले. काम काय करावयाचे, यात स्पष्टता नव्हती आणि सुरक्षेसाठी काही मदतही नव्हती. आता राजीनामा देणे हाच किरणपुढे पर्याय हाेता.असे घडलेली किरण ही एकच तरुणी नाही.अनेक तरुणी-तरुण चांगल्या वेतनाच्या माेहात असे फसतात. म्हणजेच, नाेकरी स्वीकारताना सर्वंकष विचार करावयास हवा. आपण ही नाेकरी स्वीकारावी का आणि ही कंपनी आपल्यासाठी याेग्य आहे का, असे दाेन प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवेत. नाेकरीचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी काही महत्त्वाच्या तथ्यांकडे लक्ष दिले पाहिजे.
1) कंपनीची आर्थिक स्थिती: कंपनी अथवा संस्थेच्या आर्थिक स्थितीबराेबर तुमच्या विकासाचा संबंध असताे. नाेकरीचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी स्टाॅक मार्केटमध्ये कंपनीची स्थिती काय आहे, हे पाहावयास हवे. ग्राहकांचा आधार आणि विक्रीच्या आकड्यांतून ती स्थिती समजते. नाेकरीची जाहिरात देताना त्याचा उल्लेख नसेल, तर तुमचा नियाे्नता कसा असू शकेल, हे कळू शकते.
2) रिक्रुटर प्राेफाइलची माहिती: तुम्ही नाेकरी करू इच्छित असलेली कंपनी कितीही चांगली, माहितीची असाे; मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) यांची प्राेफाइल ऑनलाइन पाहता येते. तुमच्या मुलाखतकर्त्याची प्राेफाइलही मिळवू शकता. कर्मचारी आणि नियाे्नत्यांची माहिती घेता येते. या कामासाठी प्राेफेशनल साेशल नेटवर्कवेबसाइट्सचा उपयाेग करू शकता.
3) कितपत विश्वासार्ह?: मिनिस्ट्री ऑफ काॅर्पाेरेट अफेअर्स हे एक सरकारी पाेर्टल असून, त्यावर देशातील निगमित कंपन्यांची माहिती असते. यात कंपनीचे नाव टाकून कंपनीचे पंजीकरण, तिच्या निगमनाची तारीख आणि अन्य माहिती मिळविता येते.
4) लाभ आणि भत्त्यांकडे लक्ष द्या: कर्मचारी लाभ, आजारपणाची सुटी, आराेग्य विमा आणि सेवानिवृत्ती याेजना या पॅकेजच्या सुमारे 30 ट्नके असतात. त्यामुळे थाेडा वेळ काढून प्रस्तावाची समीक्षा करा.
5) सुरक्षेबाबत प्रश्न विचारा: तुम्ही साेशल वर्कची नाेकरी करणार असाल, तर ती संस्था तुम्हाला काेठे पाठविणार, तेथे तुमची व्यवस्था काय करणार, हे प्रश्न आवर्जून विचारा. विशेषत: तुम्ही स्त्री असाल, तर तुमच्या सुरक्षेबाबतचे प्रश्न विचारायलाच हवेत.
6) विचारपूर्वक निर्णय घ्या: नाेकरीवर रुजू हाेण्यापूर्वी प्रस्ताव पत्र जरूर घ्या. नियाे्नता आणि कर्मचारी यांच्यातील ते कायदेशीर बंधन असते आणि त्यात सर्व नियम-अटी असतात; पण असे पत्र न देणारी कंपनी अनैतिक असते. पुराव्याविना बँक खात्यातून वेतन घेण्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.