हायड्राेजनवरील सर्वांत वेगवान रेल्वे चीनमध्ये सुरू

    08-Feb-2023
Total Views |
 
 

Hydrogen 
 
ताशी 160 किलाेमीटर वेग; मात्र इंधन भरल्यावर मिळणाऱ्या रेंजबाबत जर्मन रेल्वेगाड्या अव्वल हायड्राेजनवर धावणारी जगातील सर्वांत वेगवान रेल्वेगाडी चीनमध्ये सुरू झाली आहे.ताशी 160 किलाेमीटरच्या वेगाने धावणाऱ्या या गाडीची निर्मिती ‘सीआरआरसी काॅर्पाेरेशन’ या सरकारी कंपनीने केली आहे.जागतिक तापमानवाढ आणि हवामानातील बदलांमुळे पारंपरिक ऊर्जास्राेतांना पर्याय शाेधला जात असून, हायड्राेजन ऊर्जा हा त्यातील सर्वाे त्तम असल्याचे आढळले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी ही गाडी सुरू करण्यात आली असून, हायड्राेजन ऊर्जेवरील रेल्वे सुरू करणारा चीन हा जर्मनीनंतरचा दुसरा देश ठरला आहे.चेंगडू रेल ट्रांझिट हा विभाग देशातील पहिला हायड्राेजन रेल ट्रांझिट ठरला आहे.
 
पल्ल्याबाबत जर्मनी आघाडीवर: हायड्राेजनवर धावणाऱ्या जगातील पहिल्या रेल्वेगाड्या जर्मनीत सुरू झाल्या. तेथे आता अशा 14 गाड्या धावत असल्या, तरी वेगाच्या मुद्द्यावर चीनची गाडी अव्वल आहे.जर्मन रेल्वेगाड्या ताशी 140 किलाेमीटरच्या वेगाने धावतात आणि चीनमध्ये सुरू झालेल्या गाडीचा वेग ताशी 160 किलाेमीटर आहे.मात्र, एकदा इंधन भरल्यावर गाडी धावण्याचा पल्ला (रेंज) पाहिला, तर जर्मनी अव्वल आहे.पूर्ण इंधन भरल्यावर जर्मन रेल्वेगाडी एक हजार किलाेमीटर अंतर धावते, तर चिनी गाडी फ्नत 600 किलाेमीटर. हा या दाेन्हींतील फरक आहे.
 
फ्रान्सने केली निर्मिती: जर्मनीतील हायड्राेजन रेल्वेगाड्यांची निर्मिती फ्रान्समधील ‘एल्सटाॅम’ या कंपनीने केली आहे. या गाडीमध्ये फ्युएल सेल असतात आणि त्यात हायड्राेजन वायू भरला जाताे.हे सेल ट्रेनच्या छतावर लावलेले असतात.त्यांच्यात ऑ्निसजन मिसळल्यावर पाणी तयार हाेते आणि या प्रक्रियेत तयार हाेणाऱ्या ऊर्जेवर ही गाडी धावते.भारतात या
 
वर्षअखेरपर्यंत प्रारंभ:भारतातसुद्धा या वर्षअखेरपर्यंत हायड्राेजन ऊर्जेवरील रेल्वेगाड्या धावायला लागण्याची श्नयता आहे. उत्तर रेल्वेच्या कार्यशाळेत चाचणीसाठी या गाडीचे माॅडेल तयार केले जात असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. या गाड्या स्वदेशी बनावटीच्या असतील. येत्या मे-जूनपर्यंत या गाडीचे डिझाइन तयार हाेण्याची अपेक्षा आहे. हरियाणातील साेनिपत-जिंद या मार्गावर या गाडीची चाचणी करण्यात येईल. डिसेंबर 2023 पासून महत्त्वाच्या मार्गांवर हायड्राेजन रेल्वेगाड्या धावायला लागण्याची श्नयता वैष्णव यांनी व्य्नत केली.