स्किन फेड हेअरकटचे गिनीज रेकाॅर्ड

08 Feb 2023 17:15:20
 
 


Haircut
 
दक्षिण आफ्रिकेतील या बार्बरने तरुण वयातच जागतिक विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील जाेहान्सबर्गमध्ये बार्बर एनरिकाे स्प्रिंगफील्डने 18 मिनिटे आणि 57 सेकंदांत पाच स्किन फेड हेअरकट (झिराे मशिनने केलेली कटिंग) पूर्ण करून गिनीज रेकाॅर्ड बनविले आहे. या आधीचे रेकाॅर्ड 20 मिनिटांचे हाेते.ही कामगिरी करणाऱ्या 23 वर्षीय बार्बरचे म्हणणे आहे की, त्याने 13 वर्षांच्या वयातच केस कापण्याचे काम सुरू केले हाेते. त्याला वाटत नव्हते की, एक दिवस ताे पाच स्किन फेड हेअरकट करण्यासाठी सर्वात कमी वेळाचे रेकाॅर्ड बनवू शकेन. ही माझ्यासाठी अभिमानाची गाेष्ट आहे आणि असे नवीन करणे मी चालू ठेवीन.Stumbo Record Breakers या मालिकेत एनरिकाे याच्या कामगिरीचे चित्रण पहावयास मिळते.
Powered By Sangraha 9.0