दिलखुलासमध्ये डाॅ. शीतल सावनकर यांची मुलाखत

08 Feb 2023 17:27:30
 

Dilkhulas 
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डाॅ. शीतल सावनकर यांची मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूजऑन एआयआर या माेबाइल अ‍ॅपवर बुधवारी (8 फेब्रुवारी) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित हाेईल.वंध्यत्व काय आहे, यावर असणारी प्रभावी उपचारपद्धती, आराेग्याची घ्यावयाची काळजी, अशा विविध विषयांवरील उपयुक्त माहिती डाॅ. सावनकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक डाॅ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0