मुलांना चिखलात खेळू द्या; त्यामुळे त्यांची प्रतिकारश्नती वाढते

    08-Feb-2023
Total Views |
 
 

Children 
मातीत खेळू नका, कपडे घाण हाेतील’ असे मुलाला नेहमीच आई-वडील सांगतात. तुम्हीही तुमच्या मुलांना मातीत खेळण्यापासून राेखत असाल, तर आजपासून असे करणे बंद करा. माती आणि वाळूमध्ये असे सूक्ष्मजीव असतात, जे मुलांच्या आराेग्यासाठी चांगले असतात.यामुळे त्यांची राेगप्रतिकारक श्नती वाढते.मातीत खेळल्याने मुलांना अ‍ॅलर्जी-दम्याचा त्रास हाेण्याची शक्यता खूप कमी हाेते.नैराश्य, चिंता पळून जाते.याबाबत इटलीच्या संशाेधक अ‍ॅलेसिया फ्रँकाे आणि डेव्हिड रॅबसन म्हणतात की, संशाेधनात असे दिसले की, नैसर्गिक वातावरणात मु्नतपणे फिरणे मुलांना राेगांपासून राेखण्यास अधिक मजबूत बनवते. चिखल-माती आणि वाळूमुलांच्या ज्ञानेंद्रियांचा विकास करतात.ही एकप्रकारची थेरपी आहे, जी केवळ राेग बरे करत नाही, तर आजारी पडण्यापासूनदेखील प्रतिबंधित करते. जी मुले त्यांच्या भावना व्य्नत करू शकत नाहीत, त्यांना सँड ट्रे थेरपी दिली जाते.
 
ब्लू स्पेस म्हणजे समुद्र, नदी, सराेवर आणि हिरवीगार जागा म्हणजे जंगल, उद्यान, बाग अशी हिरवीगार जागा हाेय. संशाेधक फ्रँकाे आणि रेक्सन म्हणतात की, नैसर्गिक जागा मेंदूला अशा पातळीवर उत्तेजित करतात की ते एकप्रकारे रिचार्ज हाेते. जसे पर्वत किंवा समुद्राची सहल शरीर-मन दाेन्हींना ताजेतवाने करते. आपल्याला यामुळे अधिक उत्साही वाटू लागते. पूर्वीच्या एका अभ्यासात असे सुचवण्यात आले की फरशी, रस्ता इत्यादीसारख्या शहरी पृष्ठभागावर 20 मिनिटे चालण्याच्या तुलनेत उद्यानात 20 मिनिटे अनवाणी चालणे लक्ष वेधून घेते. एडीएचडी (अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर) रुग्णांची एकाग्रतादेखील वाढवते, असे या संशाेधनात दिसले आहे.दुसऱ्या एका संशाेधनात असे समाेर आले की, जी मुले निळ्या, हिरव्या जागेत जास्त वेळ घालवतात ते चांगले मानव बनतात.