अ‍ॅलर्जी म्हणजे काय असते?

08 Feb 2023 17:36:22
 

Allergy 
 
अलीकडे अनेक लाेकांमध्ये आढळून येणारी समस्या म्हणजे अ‍ॅलर्जी. अलीकडे इतके प्रदूषण वाढलंय की त्यामुळे बहुतेकांना अ‍ॅलर्जीचा त्रास हाेत असते. अ‍ॅलर्जी म्हणजे निसर्गात असलेल्या काही घटकांना शरीर प्रतिबंध करते.अ‍ॅलर्जी कशाचीही राहू शकते.एखाद्या गाेष्टींची अ‍ॅलर्जी असली की, प्रतिकारश्नती कमी झाल्याने श्वास लागणे, कफ, शिंका, घसा खवखवणे, त्वचेवर पुरळ येणे, र्नतदाब कमी किंवा जास्त हाेणे यापैकी कुठलाही त्रास हाेऊ शकताे.
 
अ‍ॅलर्जी टाळण्यासाठी टेस्ट(चाचणी) करून घेणे आवश्यक असते, ज्यामुळे आराेग्याचं हाेणारं नुकसान टाळता येतं. या चाचणीसाठी स्किनिंग टेस्ट केली जाते. त्यामुळे त्या व्य्नतीला अ‍ॅलर्जी आहे की नाही हे समजून येते.अ‍ॅलर्जीसंबंधी चाचण्यांमुळे तुम्हांला काेणती अ‍ॅलर्जी आहे हे अचूक कळतं.लक्षणं, वय, वातावरण, भैगाेलिक परिस्थिती, वैद्यकीय इतिहास यानुसार त्या व्य्नतीला असलेल्या अ‍ॅलर्जीचं निदान केलं जातं.अन्नापासून अ‍ॅलर्जी हाेऊ शकते, त्याची लक्षणे अशी आहेत.
 
 पित्त, खाज येणे किंवा गजकर्ण. 
 ओठ, चेहरा, जीभ आणि घसा किंवा शरीरातील एखादा भाग सुजणे.
 घसा खवखवणे, नाक चाेंदणे, श्वास घेण्यास त्रास हाेणे.
 पाेटदुखी, मळमळणे, उलटी हाेणे.
 निराश वाटणे, डाेकेदुखी किंवा च्नकर येणे.
Powered By Sangraha 9.0