याेग्य नियाेजनाने नववर्षाचे संकल्प पूर्ण हाेतात

    06-Feb-2023
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 
 
planning
 
काेणतेही चांगले काम सुरू करण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज नसते. मात्र, अनेक लाेक त्यासाठी नवे वर्ष सुरू हाेण्याची वाट का पाहतात हे कळत नाही. नवे वर्ष म्हणजे काेरी पाटी असल्याचे वाटत असल्याने असे हाेत असावे. दरवर्षी लाखाे लाेक नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त भरपूर संकल्प करतात.काेणी राेज व्यायामाचा, काेणी वाचनाचा, तर काेणी नवी भाषा शिकण्याचा. पण, याेग्य सुरुवातीअभावी यातील फक्त 46 टक्के संकल्प प्रत्यक्षात येतात.80 ट्न्नयांपेक्षा जास्त लाेक जेमतेम जानेवारी अखेरपर्यंत संकल्पाला चिकटून राहतात आणि फेब्रुवारीपासून येरे माझ्या मागल्या धाेरण सुरू हाेत असल्याचे मानसशास्त्रज्ञ सांगतात.
 
स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, नव्या वर्षानिमित्त केल्या जाणाऱ्या संकल्पांपैकी 70 टक्के आराेग्याशी संबंधित असतात. काेराेना महामारीनंतर आता मानसिक आराेग्य, वेळेवर आणि पाैष्टिक आहार आणि आर्थिक नियाेजनाचे संकल्प करणारे वाढले आहेत. मात्र, पाच संकल्प असे आहेत, की ते अमलात आणण्यासाठी नवे वर्ष किंवा एखाद्या विशिष्ट दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. बघा, काेणते आहेत हे संकल्प.
 
1) प्रतिक्रिया जपूनच द्या : आपल्या आजच्या स्थितीला दुसरे लाेक जबाबदार असल्याची अनेकांची भावना असते आणि तुम्हीसुद्धा त्यात येत असाल, तर ती बदलण्याची गरज आहे. वास्तवात पाहता, तुमच्या आजच्या स्थितीला आणि जीवनाला तुम्हीच जबाबदार असता. हाती घेतलेले काम पूर्ण करणे हे यशस्वी व्यक्तींचे वैशिष्ट्य असते. ते काेणत्याही जबाबदाऱ्या टाळत नाहीत आणि इतरांना दाेष देण्यात तसेच टीका करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवित नाहीत. आपल्या अनुभवांची तुलना करून आपल्याला वेगळे काय करावयाचे आहे हे यशस्वी व्यक्ती ठरवितात.
 
तुम्हालाही तसे व्हायचे असेल, तर आपल्या जीवनातील प्रत्येक घडामाेडीची शंभर टक्के जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजेत. ते करायला लागल्यावर तुम्हाला इतरांबाबत तक्रारी करण्याचे कारण उरणार नाही. माझे कुटुंबीय माझी पर्वा करत नाहीत असे म्हणण्यापेक्षा मी माझ्या कुटुंबीयांबाबतच्या नकारात्मक भावना दूर करून त्यांच्याबराेबर मिळून जगणे शिकेन असा विचार केलात, तर फायदा हाेईल. म्हणजेच, यशस्वी व्हावयाचे असेल, तर आतून बदल करणे सुरू केले पाहिजे.
 
2) स्वत:कडे लक्ष देणे : स्वत:कडे लक्ष देणे म्हणजे सेल्फ केअर. यात काेणताही स्वार्थ नसून, आपले आराेग्य चांगले राहण्यासाठी ते आवश्यक असते. स्वत:कडे लक्ष दिलेत, तर नैराश्य आणि चिंतेच्या भावना घटून सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येताे. तुम्ही स्वत:साठी अथवा इतरांसाठी जरी काम करत असाल, तरी आधी स्वत:ची काळजी घेणे शिकावयास हवे. ते जमले नाही, तर कसाेटीच्या काळात तुम्हाला त्रास हाेताे. खूप दबावाखाली असताना मनासारखे काम न हाेण्याचा अनुभव सर्वांना येताे. स्वत:ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केलेत, तर त्याचे वाईट परिणाम हळूहळू दिसायला लागतात. तणावात असताना रिलॅ्नस हाेण्याचा प्रयत्न करा.यासाठी शांत बसून खाेलवर श्वास घ्या, श्नय असेल तर थाेडे फिरून या. सकारात्मक बाेला किंवा याेगासने करा.
 
3) पाऊल डगमगू देऊ नका : जीवनातील प्रत्येक दिवस खूप छान असल्याचे समजूनवागायला हवे. आज आपली उद्दिष्टे काय आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी काय करावे लागणार आहे, याचा विचार करा. आपल्याला काय करवयाचे आहे याची एका कागदावर नाेंद करून ठेवा. त्यांचे नियमित वाचन करा. सकाळी 15 मिनिटांचा वेळ आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी काय प्रयत्न करावेत याच्या विचारांसाठी ठेवा. त्यातून तुमच्या सुप्त मनातील ऊर्जा जागृत हाेते. विचार पक्के झाल्यावर उद्दिष्ट गाठायचा प्रयत्न करा.
हे करताना पाऊल डगमगू देऊ नका.
 
4) नकारात्मक विचार टाळा : भूतकाळाचा विचार वर्तमान क्षणाचा आनंद घालवून टाकताे. आपण काय शब्द वापरताे यावरसुद्धा बरेच काही अवलंबून असते. असे झाले नसते तर, असे झाले तर काय हाेईल किंवा मी हे करू शकत नाही अशी वा्नये तुम्ही वारंवार वापरत असाल, तर सावध व्हा. नाेकरीचा ताे प्रस्ताव मी स्वीकारायला हवा हाेता, माझी नाेकरी अचानक गेली तर काही खरे नाही, हे काम मी स्वबळावर करू शकत नाही असे बाेलणे म्हणजेसुद्धा नकारात्मक विचार असतात. हे विचार सकारात्मकतेत बदला. ते करत गेलात, तर नैराश्य कमी हाेऊन विधायक विचार वाढतील.हे काही उपाय आहेत. नवे काही करण्यासाठी नव्या वर्षाची सुरुवात हीच वेळ नसते. चांगल्या कामासाठी काेणताही दिवस चांगलाच असल्याचे लक्षात ठेवा आणि स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काम सुरू करा.