भाविक घाबरतात असे भयानक मंदिर

    06-Feb-2023
Total Views |
 
 

Temple 
 
भाविक दरराेज सकाळी-संध्याकाळी मंदिरात जातात. श्रद्धापूर्वक देवाचे दर्शन घेतात. पण, आपल्याच देशात असे एक भयानक मंदिर आहे, जेथे भाविकसुद्धा पाय ठेवायला घाबरतात. हे भयानक मंदिर यमराज मंदिर असून, ते हिमाचल प्रदेशातील चंबाजवळ भरमाैरे येथे आहे. या मंदिरात लाेक प्रवेश करायला घाबरतात व बाहेरूनच हात जाेडून नमस्कार करतात.चंबा जिल्ह्यात अशी मान्यता आहे की, या मंदिरात प्रत्यक्ष यमराज वास्तव्य करतात. या मंदिरात एका बाजूला रिकामी खाेली आहे. या खाेलीला चित्रगुप्त खंड असे म्हणतात. या चंबा शहरातील लाेक असे मानतात की, काेणत्याही व्य्नतीचा मृत्यू झाल्यास यमराजाचे दूत त्या मृत व्य्नतीचे प्राण याच मंदिरात आणतात.
 
त्यानंतर चित्रगुप्त पाप पुण्याची नाेंद असलेली वही तपासून मृतात्म्याला स्वर्गात पाठवायचे की नरकात, याचा निर्णय घेतात. या मंदिराला 4 अदृश्य दरवाजे आहेत. साेने, चांदी, तांबे आणि लाेखंडाचे हे अदृश्य दरवाजे असून, मृतात्म्याच्या कर्मानुसार त्याला या चारपैकी एका दरवाज्यातून यमदूत नेतात, अशी लाेकांची भावना आहे.गरुड पुराणात यमलाेकात जाण्यासाठी 4 दरवाजे असल्याचा उल्लेख आहे.अकाली मृत्यू झालेल्या व्य्नतीचे या मंदिरात पिंडदान (तर्पण) करण्याचीही प्राचीन परंपरा आहे.