जगणे गृहीत धरून चालू नका...

    06-Feb-2023
Total Views |
 

Living 
 
तुम्ही कधी थांबून हृदयावर हात ठेवून त्याची धडधड ऐकली आहे का? तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, ज्यांची काळजी घेता त्यांना कधी थांबून सांगितले आहे का, की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता? ताण आणि चिंतेमुळे आपले मन अस्वस्थ हाेऊ देऊ नका आणि वेळ वाया घालवू नका. प्रत्येक श्वास अशा पद्धतीने जगा की, जणू काही ताे तुमच्या आयुष्यातील शेवटचा श्वास असणार आहे.
 
पाठबळ आणि आशीर्वादांचा हिशेब मांडा: तक्रारी करणे आणि आपल्याकडे जे नाही त्याविषयी कुरकुर करत बसणे साेपे असते. असे करून आपण स्वतः मध्येच एक प्रकारची कटुता निर्माण करत असताे. त्याऐवजी तुमच्याकडे जे आहे ते किती अनमाेल आहे याचा विचार करा.असलेल्या गाेष्टींचे काैतुक करायला शिका. विशेषतः आपल्या अवतीभवती असलेल्या माणसे, नाती याची दखल घ्या, त्यांचे काैतुक करा. तुमच्या भाेवती जे काही चांगले आहे, आयुष्यात घडलेल्या आणि घडणाऱ्या चांगल्या घटना एका कागदावर लिहून काढा. राेजच्या धकाधकीत आपण दुर्लक्ष करताे अशा चांगल्या घटना, लाेकांचे चांगले वागणे लिहून काढा. जीवनात याच गाेष्टींना माेठी किंमत असते.
 
सलाेखा: आयुष्य हे खूप छाेटे असते. त्यामुळे कुणाविषयी मनात अढी ठेवून वागू नका. माफ करा आणि पुढे चला.स्वतःकडून चूक झाली, तर माफी मागा, दिलगिरी व्यक्त करा आणि सगळे विसरून कामाला लागा. यामुळे नाती अधिक घट्ट बनतात आणि एवढेच नव्हे, तर तणावमुक्त जगण्यासाठी मदत हाेते.
 
बकेट लिस्ट बनवा: वर्षभरात काय साध्य करायचे, प्रत्येक महिन्याचे उद्दिष्ट आणि दिवसभरातील कामे ठरवून घ्या आणि ती पूर्ण करा. राेजच्या छाेट्या कामगिरीचाही आनंद साजरा करा आणि माेठ्या यशाबद्दल सगळ्यांसमवेत वाजतगाजत पार्टी करा.
 
स्वतःचे आयुष्य जगा:जर-तर विसरा आणि आयुष्याचा आनंद घ्या. काेण काय म्हणेल याचा विचार करत बसू नका. आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव घ्या. यश-अपयशाला सामाेरे जायला शिका. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असताे.आपण त्याचा विचार कसा करताे त्यावरून त्याची तीव्रता ठरत असते. त्यामुळे संघर्षाचा बाऊ करून तक्रारी करत बसू नका.तुमची स्वप्ने आणि ध्येय पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही ठरवले, तर ते गाठण्यापासून तुम्हाला कुणीही राेखू शकणार नाही