जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा नाते आदर्श ठरेल

    06-Feb-2023
Total Views |
 
 
 

Japan 
 
मुख्यमंत्र्यांचा विश्वास : महाराष्ट्र व वाकायामात सामंजस्य कराराचे नूतनीकरण भारत आणि जपानमधील संबंध पूर्वापार आहेत. ते अधिकाधिक दृढ हाेण्यास या करारामुळे मदतच हाेणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांसाठी वैविध्यपूर्ण असे प्रकल्प सुरू आहेत.या सर्वच क्षेत्रांत जपानने सहकार्याचा हात पुढे केला आहे, ही आनंदाची गाेष्ट आहे. जपान-भारत आणि महाराष्ट्र आणिवाकायामा हे नाते आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र शासन आणि जपानच्या वाकायामा प्रांतात सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बाेलत हाेते.
 
या वेळी विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाकायामाचे गव्हर्नर किशीमाेटाे शुहेही, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लाेढा, शालेय शिक्षण मंत्री दीपककेसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव साैरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जाेशी-शर्मा, पर्यटन संचालक बी.एन. पाटील, जपानचे 45 जणांचे शिष्टमंडळ, अधिकारी, नागरिक उपस्थित हाेते. या वेळी सुमाे व महाराष्ट्रीयन कुस्तीची प्रात्यक्षिके खेळाडूंनी सादर केली. यानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे लेझर शाेचेही आयाेजन करण्यात आले.सुमाे जपानमध्ये लाेकप्रिय असून, महाराष्ट्रात कुस्ती लाेकप्रिय आहे. या समान धाग्यामुळे दाेन्ही देशांचे संबंध अधिक दृढ हाेऊन दाेन्ही देशांना जाेडणारा दुवा ठरेल, असा विश्वास अ‍ॅड. नार्वेकर यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री फडणवीस व लाेढा यांनीही मनाेगत व्यक्त केले. या सामंजस्य करारामुळे दाेन्ही राज्यांच्या विकासात भर पडेल, असा विश्वास शुहेही यांनी व्यक्त केला.