पायात पेटके आल्यास काय कराल?

    06-Feb-2023
Total Views |
 
 

Health 
 
या पेट्नयांची तीव्रता जास्त असेल तर हाेणाऱ्या वेदनेची तीव्रताही जास्त असते.तुम्ही झाेपलेले असताना किंवा आराम करत असताना किंवा व्यायाम करत असताना पेट्नयांचे प्रमाण जास्त असते.शरीरातील द्रवाचं प्रमाण कमी किंवा कॅल्शिअमचं प्रमाण कमी झालं असताना खेळल्यास किंवा शारीरिक कष्ट केल्यास स्नायूंमध्ये पेटके येण्याची श्नयता असते. पेटके फ्नत खेळाडूंनाच नाही, तर कष्ट कणाऱ्यांना, गर्भवती स्त्रियांना, 50 नंतर वय झालेल्यांनाही पेटके येत असतात.
 
दिवसा किंवा रात्रीच्या वेळी पायांत पेटके येऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये हवा उष्ण असल्यामुळे घाम येताे आणि त्यामुळे आपल्या शरीरातील द्रवाचं प्रमाण झपाट्याने कमी हाेत जातं. शरीरातील पाेटॅशिअम आणि मॅग्नेशिअम इले्नट्राेलाईट्सच्या स्वरूपामध्ये घामावाटे शरीरातून बाहेर पडते. त्यामुळे शरीरामध्ये या घटकांची कमतरता निर्माण हाेऊन स्नायूंमध्ये पेटके येण्याचं प्रमाण वाढतं. व्यायाम करत असताना स्नायूंमध्ये पेटके आल्यास स्नायू ओढले गेल्याचं जाणवून वेदना हाेऊ लागतात.याला प्रतिबंध करण्याच्या उपाय म्हणून कॅल्शिअम, मॅग्निशिअम आणि पाेटॅशिअम यांचा आहारात समावेश करावा आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
 
पेटके आल्यास काय करावे?
 करत असलेले काम थांबवा, आणि पेटके आलेला भाग ताणण्याचा प्रयत्न करा. त्या भागाला मालीश करा.
 स्नायूंमध्ये सूज असल्यास जळजळ न करणारी औषधे वेदनेपासून आराम देण्यास मदत करू शकतात.
 क्षमतेनुसार व्यायाम करा आणि व्यायामात बदल करत राहा.
 भरपूर द्रव पदार्थाचे सेवन करा, पाॅटॅशिअमचे प्रमाण वाढवा, संत्री व केळी यात पाॅटॅशिअम असते.
 पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचं सेवन न करणे हे खेळताना पेटके येण्याचं कारण असतं.