जर्मनीतील ब्लॅक फाॅरेस्ट खाेऱ्याचा राेमांचक रस्ता

    06-Feb-2023
Total Views |
 
 

Germany 
जर्मनीतील ब्लॅक फाॅरेस्ट वुर्टेमबर्ग येथे आहे. हा परिसर घनदाट जंगल आणि डाेंगरांनी वेढलेला आहे. येथून जवळच निसर्गरम्य राइन खाेरे आहे. या खाेऱ्यातून जाणाऱ्या रस्त्यावर कार चालविता येते. पर्यटकांना या खाेऱ्यात राेमांचक अनुभूती येते. या रस्त्याची देखरेख ब्लॅक फाॅरेस्ट साेसायटीचे सदस्य करतात. या जंगलात सर्वांत जास्त चीड आणि देवदार वृक्ष आहेत. खालच्या भागात पायी चालण्यासाठी रस्ते आहेत. याशिवाय माउंटेन बायकिंग आणि स्किइंगसाठी वेगवेगळे रस्ते आहेत.