राजस्थानमध्ये गाढवांची पूजा हाेते

06 Feb 2023 14:05:13
 
 


Donkey 
 
मूर्ख माणसाला जगभर गाढव म्हणतात. पण खरे तर हा गाढवाचा घाेर अपमान आहे. कारण गाढव कष्टाळू, प्रामाणिक व बुद्धिमान आहेच, शिवाय चारापाण्यासाठी गाढव त्याच्या मालकावर विसंबून राहत नाही. हे गर्दभ महात्म्य ओळखणारे राजस्थान हे देशातीलच नव्हे, तर जगातील एकमेव राज्य असावे. गाढवाची सर्वत्र उपेक्षा हाेते. पण, राजस्थानमध्ये पूजा हाेते. राजस्थानमध्ये वर्षातून एकदा शितला अष्टमीच्या दिवशी गाढवांची विधिपूर्वक पूजा केली जाते. कारण गाढव शितलामाता देवीचे वाहन आहे.बिकानेरमध्येशितलादेवीची गर्दभारूढ मूर्ती आहे. हाेळीनंतर येणाऱ्या शितला अष्टमीला येथे माेठी यात्रा भरते. गाढवांची आकर्षक सजावट करून त्यांची मनाेभावे पूजा करतात. शितलादेवीला केलेला नवस पूर्ण झाला, तर लाेक मंदिरात गाढव अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे.
 
Powered By Sangraha 9.0