व्यवसायाच्या प्रचंड आकारामुळे कंपन्यांपुढील समस्या वाढल्या

    06-Feb-2023
Total Views |
 
 

Amazon 
 
पाच बड्या कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण, गुंतवणुकीवरील परतावाही घटला संध्यानंद.काॅम व्यवसाय केला जाताे ताे नफा मिळविण्यासाठी. नफा वाढल्यावर विस्तारीकरण सुरू हाेते आणि व्याप वाढत जाताे. अनेकदा व्यवसायाच्या प्रचंड आकारामुळे त्याचे व्यवस्थापन करणे कठीण हाेऊ लागते आणि अन्य समस्याही येऊ लागतात.अ‍ॅमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझाेस यांनी त्यांच्या भागधारकांना (शेअरहाेल्डर्स) 1997मध्ये पहिले पत्र लिहिले हाेते.त्यांच्या कंपनीसाठी हा आजही पहिला दिवस असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला हाेता आणि दुसरा दिवस म्हणजे थांबणे असा असल्याचेही म्हटले हाेते.जे मिळाले त्यात खुश राहणे टाळा, असा या पत्राचा अर्थ हाेता.
 
त्यांचे हे पत्र आजही याेग्य वाटते. अमेरिकेच्या सिलिकाॅन व्हॅलीतील अल्फाबेट (गुगल), अ‍ॅमेझाॅन, अ‍ॅपल, मेटा (फेसबुक) आणि मायक्राेसाॅफ्ट या पाच माेठ्या टे्ननाॅलाॅजी कंपन्या अजूनही अमेरिकेचा शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया असून, त्यांचा विकासाचा वेग आणि नफ्याचे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तिमाहीतील संकेतांमुळे बिघडलेल्या स्थितीची जाणीवही हाेऊ लागली आहे. या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य 37 ट्न्नयांनी कमी झाले असून, या कंपन्यांच्या मूल्यात 305 लाख काेटी रुपयांची घसरण झाली आहे.प्रचंड उद्याेगांबाबतचा नियम या बड्या टेक कंपन्या लवकरच स्थैर्य मिळवतील असे सांगताे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत महागाईच्या तुलनेत विक्रीतील वाढ 9 टक्के जास्त हाेती.
 
माेठ्या आकारामुळे या कंपन्या अर्थचक्राबराेबर संबंधित आहेत.महामारीच्या काळात डिजिटल व्यवसायात झालेल्या वाढीमुळे हे तथ्य काही काळ मागे पडले हाेते. स्मार्टफाेन, डिजिटल अ‍ॅडव्हर्टायझिंग आणि स्ट्रिमिंगची पाेहाेच वाढल्यामुळे मुख्य व्यवसायात मंदी येऊन बड्या कंपन्या एकमेकांच्या क्षेत्रात शिरत आहेत.टे्ननाॅलाॅजी कंपन्यांमध्ये नियमांचा पेच असताे. या कंपन्या त्यांचे बाॅस आणि संस्थापकांना गरजेपेक्षा जास्त अधिकार बहाल करतात. काही जणांना तर खास ‘व्हाेटिंग’चासुद्धा अधिकार असताे.असे बाॅस स्वप्नदर्शी हाेण्याच्या प्रतिमेत अडकतात आणि त्यामुळे त्यांच्या माेठ्या याेजना असफल ठरतात. फेसबुकच्या मेटा या कंपनीचे उदाहरण पाहा. मार्क झुकेरबर्ग ही कंपनी व्यवस्थित चालवू शकत नसल्याचे दिसते. या कंपनीचे मूल्य आतापर्यंत 74 ट्न्नयांनी घटले असून, त्यांचा मुख्य व्यवसाय डगमगत चालताे आहे.
 
साेशल मीडियापेक्षा वेगळ्या क्षेत्रात उद्याेगाचा विस्तार करण्यासाठी झुकेरबर्ग यांनी मेटा या कंपनीला डावावर लावले आहे. अ‍ॅपल कंपनीने पहिला आयफाेन विकसित करण्यासाठी जेवढा पैसा गुंतविला हाेता, त्यापेक्षा वीसपट रक्कम झुकेरबर्ग यांनी मेटासाठी गुंतविली आहे. झुकेरबर्ग यांच्याकडे 54 टक्के ‘व्हाेटिंग’ अधिकार असल्यामुळे ते गुंतवणूकदारांकडे दुर्लक्ष करू शकतात. गुगलची मालक असलेली अल्फाबेट कंपनीची प्रगती बरी असली, तरी चांगली नाही. या कंपनीच्या संस्थापकांकडे 51 टक्के ‘व्हाेटिंग’ अधिकार आहेत.अ‍ॅमेझाॅनची स्थिती या दाेन कंपन्यांच्या दरम्यान आहे.
 
या कंपनीने ई-काॅमर्स क्षेत्रात फार माेठी गुंतवणूक केली असून, गरजेपेक्षा जास्त विस्तार झाल्यामुळे राेख रकमेची आवक आणि रिटर्न्स कमी झाले आहेत. कंपनीचे कार्यकारी अधिकारी जेफ बेझाेस यांच्याकडे 15 टक्के ‘व्हाेटिंग’ अधिकार असल्यामुळे त्यांना गुंतवणूकदारांच्या म्हणण्याकडे थाेडे लक्ष द्यावे लागते.अ‍ॅपल आणि मायक्राेसाॅफ्ट या जुन्या कंपन्या असून, त्यांच्या संस्थापकांकडे जास्त शेअर नाहीत. ‘एक शेअर-एक मत’ या सिद्धान्तावर या कंपन्या चालतात. या दाेन्ही कंपन्या बाहेरच्या लाेकांचे म्हणणे ऐकून घेतात. पाच बड्या कंपन्यांमध्ये याच दाेन कंपन्यांची प्रगती चांगली आहे