दूषित पाणी शरीरासाठी घातक ठरते...

    04-Feb-2023
Total Views |
 

water 
 
 
एका निर्धारित कालावधीनंतर पाण्यामध्ये असणारे प्रदूषक घटक घातक ठरतात. काही वेळेस काही प्रदूषित घटक म्हणजे लीड किंवा रस्ट इत्यादी पाण्यावर प्रक्रिया झाल्यानंतर पाण्यामध्ये मिसळतात.अशावेळेस पाणी उकळून घेणे उपयुक्त उपाय ठरत नाही. उलट जीवाणू किंवा विषाणूंनी दूषित पाण्यास उकळण्याने पाण्याचे प्रमाण कमी हाेते आणि त्यातील प्रदूषकं वाढतात.पाण्यामध्ये अनेक प्रकारची रसायनं, धातू, विषाणू, जीवाणू, खतं, तेल, पाेषक घटक, मल, विष्ठा यांचा समावेश असताे.पाण्यामध्ये असणाऱ्या घटकांमध्ये ही क्षमता नाही की, ते प्रदूषक घटकांचा नाश करतील किंवा त्यांना वाढण्यापासून राेखतील. हे सगळं जाणून घेतल्यानंतर चिंतित हाेण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही तुमच्या घरातील पाण्याच्या गुणवत्तेविषयी चिंतित असाल, तर त्यासाठी दाेन उत्तम उपाय आहेत. पहिला क्लाेरीन किंवा ओझाेन यांसारख्या गॅसचे ऑक्सिडेशन करणे आणि दुसरा पाण्याला अल्ट्राव्हायलेट किरणांद्वारे किटाणूरहित करणे. पण, हे घरी करणे अवघड आहे. हल्ली बाजारात अनेक चांगले हाेम वाॅटर िफल्टर उपलब्ध आहेत, त्यांचा वापर तुम्ही करू शकता.
 
शुद्ध पाणी शक्य प्रदूषित पाणी पिण्याने विषारी घटक आपल्या शरीरात जाऊन आपली शारीरिक क्षमता कमी करतात. परिणामी वजनअतिप्रमाणात वाढणे, लठ्ठपणा, रूक्ष त्वचा, मासिक पाळीदरम्यान असह्य वेदना, केस गळणे, बद्धकाेष्ठता, तणाव यांसारखे आजार हाेऊ शकतात. एवढंच नाही, तर थायराॅइड ग्लँडला क्लाेरीन आणि फ्लाेरीन यांसारख्या रसायनांमुळे त्रास हाेताे. महिलांमध्ये हार्माे न्सचे असंतुलन हाेते. आज महिलांमध्ये वांझपणाची समस्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याचे मुख्य कारण हे आहे.शुद्ध पाणी पिण्याने पाेटाशी संबंधित आजार हाेण्याचा धाेका कमी हाेताे आणि जेवढं पाणी पिणं आवश्यक आहे, तेवढं पाणी पिण्याने त्वचेशी संबंधित समस्या हाेत नाहीत. दरराेज सहा ते आठ ग्लास पाणी पिणे लाभदायक आहे. पण, यामध्ये चहा, काॅी, शीतपेयं यांचा समावेश करू नका. कारण यामधील बहुतांश पदार्थ डिहायड्रेटिंग इेक्ट देतात. म्हणून भरपूर पाणी प्या आणि आराेग्य टिकवा. आणि हाे, ही गाेष्ट अवश्य पारखून बघा की, तुम्ही जे पाणी पित आहात ते शुद्ध आणि स्वच्छ आहे ना?