तुम्ही दरराेज काहीतरी वाचाल, तर वाचाल!

    04-Feb-2023
Total Views |
 
 
 

Reading 
‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ हा मूलमंत्र दिला आहे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी. मात्र, शिक्षण घेण्यासाठी वाचन हे अत्यंत गरजेचे आहे.केवळ शिक्षणासाठी नव्हेतर सामाजिक जीवनात प्रगती करायची असेल, तर वाचन करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्याकडे मवाचाल तर वाचालफ असे देखील म्हटले गेले आहे. आता तर वाचनाने आयुष्य वाढते हे एका संशाेधनात स्पष्ट झाले आहे.अभ्यास हा जीवनाचा एक भाग आहे.सर्व पालक मुलांना शाळेत पाठवतात, जेणेकरून ते वाचन आणि लेखन करून काही ज्ञान मिळवू शकतील. परंतु, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दरराेज 30 मिनिटे पुस्तक वाचल्याने 23 महिने आयुष्य जगण्यास वाढण्यास मदत हाेते.डाॅ. मायकल माॅस्ले यांनीही येल विद्यापीठाच्या संशाेधनात हा खुलासा केला आहे. डाॅ. माॅस्ले यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या सहज जीवन जगण्याच्या कलेवर आधारित एका पुस्तकात त्यांनी हा खुलासा केला आहे.
 
स्टॅनफाेर्ड युनिव्हर्सिटीच्या संशाेधक जेन ऑस्टेन यांना आढळले की, जेव्हा आपण वाचताे तेव्हा आपल्या संपूर्ण मेंदूला चालना मिळते. यासाठी त्यांनी अभ्यास करताना लाेकांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले. वाचताना संपूर्ण मेंदूतील रक्तप्रवाह वाढल्याचे समाेर आले. याचे कारण असे की, जेव्हा आपण एखादे चांगले पुस्तक वाचण्यात मग्न हाेताे तेव्हा मेंदू वाक्यांचे आवाज, वास आणि चव यांची कल्पना करू लागताे. यामुळे आपल्या मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय हाेतात. उदाहरणार्थ, ‘लॅव्हेंडर’, ‘दालचिनी’ आणि ‘साबण’ हे शब्द केवळ आपल्या मेंदूमध्ये भाषेची प्रक्रिया करत नाहीत, तर हे शब्द वाचून आपल्याला त्यांचा वास आठवताे.याॅर्क युनिव्हर्सिटीचे न्यूराेसायंटिस्ट डाॅ.रेमंड मार म्हणतात की, फिक्शन वाचून तुम्हाला इतर लाेकांबद्दल सहानुभूती वाटते. त्याचवेळी काैशल्य विकासदेखील हाेताे, कारण मेंदूचा जाे भाग आपण कथा समजण्यासाठी वापरताे ते भाग त्या कथेतील पात्रांशी समरस देखील हाेताे.