निवृत्त वाहनचालक माेरे यांचा राज्यपालांकडून भावपूर्ण सत्कार

    04-Feb-2023
Total Views |
 
 

Governor 
 
राज्यपालांचे वाहनचालक असलेले माेहन माेरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी राजभवनात हृद्य सत्कार केला. 31 जानेवारीस निवृत्त झालेले माेहन माेरे यांना राज्यपालांनी सहकुटुंब आपल्या कार्यालयात बाेलावून त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. एका छाेटेखानी निराेप समारंभात राज्यपालांनी माेरे यांच्या उत्कृष्ट कामाचा गाैरव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
 
गेली तीन वर्षे माेरे यांनी राज्यपालांच्या वाहनाचे सारथ्य केले हाेते. यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी व सहकाऱ्यांनीही माेरे यांना शुभेच्छा दिल्या. मूळचे दुधगावचे (महाबळेश्वर) असलेले माेरे 40 वर्षांच्या राजभवनातील सेवेनंतर निवृत्त झाले. या प्रदीर्घ सेवेत त्यांनी राज्यपाल डाॅ. पी. सी. अलेक्झांडर, माेहम्मद फजल, एस. एम. कृष्णा, एस. सी. जमीर यांच्या वाहनाचे सारथ्य केले. तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग, तसेच राष्ट्रपती रामनाथ काेविंद राजभवनात आले असताना त्यांच्या वाहनाचेही माेरे यांनी सारथ्य केले हाेते.