‘महाज्याेती’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना लाभणार तंत्रज्ञानाचे बळ : भुसे

    25-Feb-2023
Total Views |
 
 
 
Mahajyoti
 
विद्यार्थ्यांना ‘महाज्याेती’मार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे. या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील स्वप्नांना तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.महात्मा ज्याेतिबा फुले संशाेधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्याेती) विद्यार्थ्यांना टॅब वाटप कार्यक्रमात भुसे बाेलत हाेते. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, इतर मागास बहुजन कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डाॅ. भगवान वीर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, महाज्याेती नाशिकच्या प्रादेशिक अधिकारी सुवर्णा पगार, आयएमआरटीचे संचालक डाॅ. प्रशांत सूर्यवंशी, शिक्षण अधिकारी (मविप्र) डाॅ. विलास देशमुख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित हाेते.
 
या टॅबसाेबत राेज 6 जीबी डाटा एक वर्षासाठी मिळणार आहे. जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या ग्रामीण व शहरी भागातील ज्या विद्यार्थ्यांना 60 व 70 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत त्या 593 विद्यार्थ्यांना जेईई, नीट सीईटी परीक्षांच्या अभ्यासासाठी या टॅबचे वाटप करण्यात आले. प्रा. देवयानी फरांदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टॅबचे वाटप करण्यात आले.