स्पर्धेत भाग घेणे हाच माेठा पुरस्कार : गडकरी

    22-Feb-2023
Total Views |
 
 
 

Gadkari 
राज्यस्तरीय खाे-खाे स्पर्धेतील विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना प्राेत्साहन मिळते. येथील राज्यस्तरीय स्पर्धे तूनच राज्यासह देशातील उत्कृष्ट खेळाडू घडतील व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नावलाैकिक करतील. स्पर्धेत भाग घेणे हाच माेठा पुरस्कार असून, यातून आपले प्रावीण्य सिद्ध हाेईल व यशस्वितता खेचून आणता येईल, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.चिटणीस पार्क, महाल येथे आयाेजित (कै.) भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खाे-खाे स्पर्धेचा समाराेप व बक्षीस वितरण कार्यक्रमात गडकरी बाेलत हाेते.क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, नामदेव शिरगावकर, सुधीर निंबाळकर यावेळी उपस्थित हाेते.
 
राज्यातील विविध खाे-खाे संघटनांचे पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी, संघटकांना सन्मानित करण्यात आले. तसेच, स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पुरुष राखीव गटात प्रथम क्रमाक मुंबई उपनगरने पटकावला, तर द्वितीय क्रमांक पुणे संघाने पटकावला.तृतीय स्थानी ठाणे जिल्हा राहिला. महिला राखीव गटात ठाणे संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक नाशिक संघाने पटकावला. तृतीयस्थानी सांगली संघ राहिला.
 
किशाेर गटात प्रथम क्रमांक ठाणे जिल्हा, तर द्वितीय क्रमांक उस्मानाबाद जिल्ह्याने पटकावला. तृतीयस्थानी पुणे राहिला. किशाेरी गटात प्रथम क्रमांक सांगली जिल्हा, तर द्वितीय क्रमांक साेलापूजिल्ह्याने पटकावला. तृतीयस्थानी काेल्हापूर जिल्हा राहिला.पुरुष गटात अष्टपैलू खेळाडू मुंबई उपनगरचा ओंकार साेनवणे, संरक्षक खेळाडू आदित्य गणफुले (पुणे), तर मुंबई उपनगरचा हर्षद हातणकरला आक्रमक खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला गटात ठाण्याची शीतल भाेर, अष्टपैल खेळाडू, तर नाशिकची वैजल निशा संरक्षक खेळाडू व ठाण्याची दिव्या गायकवाड आक्रमक खेळाडू पुरस्काराने सन्मानित झाली.