संध्यानंद.काॅम मानवाला असलेल्या विविध नैसर्गिक भावनांमध्ये राग येणे एक आहे. कधी मनाविरुद्ध काही घडल्यामुळे, तर कधी अन्य काेणाच्या चुकीमुळे राग येताे. राग येणे सामान्य असले, तरी त्यावर नियंत्रण न ठेवता येणे धाे्नयाचे असते. संतापाच्या भरात केलेली काेणतीही कृती अंती नुकसानकारक ठरते. राग ही नैसर्गिक भावना असली, तरी फार गुंतागुंतीची असते. रागाच्या भरात माणसाचे खरे रूप दिसल्याचे मानले जाते. रागाच्या भरात नकाे ते हाेऊन जाते आणि नंतर पश्चात्तापाशिवाय काही उरत नाही. रागीट स्वभावामुळे औदासीन्य आणि नैराश्य वाढून व्यक्ती समाजापासून तुटत जाते. असे लाेक सदैव चिंतेत असतात, त्यांना सगळ्याची भीती वाटते आणि ते उदास व्हायला लागतात. एवढे सगळे दुष्परिणाम हाेत असल्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे किती आवश्यक आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
राग म्हणजे काय? : अंतर्गत आणि बाह्य अशा दाेन्ही कारणांमुळे राग येऊ शकताे. आपले सहकारी, मित्र अथवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे राग येताे. वाहतुकीची काेंडी, दुर्बल आर्थिक स्थिती,रेल्वे अथवा विमान रद्द हाेणे, दीर्घकालीन आजारपण, सततचा तणाव, अभ्यासाचे ओझे किंवा करिअरच्या काळजीतूनसुद्धा राग येताे. भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या कटू प्रसंगाची आठवणसुद्धा राग आणू शकते. वैद्यकीय परिभाषेनुसार, आपल्या शरीरातील हायपाेथेलेमसपासून ऑ्निसटाेसिन, वेसाेप्रेसिन आणि कार्टिकाेट्राेपिन ही संप्रेरके जाेराने स्रवायला लागल्यावर राग येताे. याचा परिणाम म्हणजे, पिट्युटरी ग्रंथीतून एड्रेनाेकाेर्टिकाेट्राॅपिक हे संप्रेरक अधिक प्रमाणात स्रवायला लागते. यातील अॅड्रिनलिन कार्टे्नसमुळे काॅर्टिकाेस्टेराॅइड स्रवायला लागते आणि हे संप्रेरक रागाला उत्तेजन देते. लवकर संतापणाऱ्या लाेकांना अनेक मनाेविकार हाेण्याची जाेखीम असते आणि त्यांची सहनशक्तीसुद्धा कमी हाेत जाते.
रागाचे प्रमुख प्रकार : राग येणे ही एक नैसर्गिक भावना असली, तरी रागाचे अनेक प्रकार असतात. उदा. काहींना लगेच राग येताे, तर काही जण सदैव रागावलेले असतात. काहींना कधीतरीच राग येताे, तर काही जण रागाच्या भरात आक्रमक हाेतात.आराेग्यतज्ज्ञांच्या मते, रागाचे बारा प्रकार आहेत. त्यातील प्रमुख असे : अॅसर्टिव्ह अँगर : अॅसर्टिव्ह अँगरला कन्स्ट्र्निटव्ह अँगर असेसुद्धा म्हणतात. हा रागाचा सर्वसामान्य प्रकार असून, त्याची तीव्रता कमी असल्यामुळे संबंधित व्यक्ती आपली जाणीव विसरत नाही आणि या रागामुळे आराेग्याचेसुद्धा काही नुकसान हाेत नाही.
बिहेवियरल अँगर : हा राग आपल्यातून बाहेर येऊन व्यवहारात दिसायला लागताे. किंचाळणे, ओरडणे, आजूबाजूच्या वस्तूंची फेकाफेक करणे अथवा जवळ असलेल्या लाेकांबाबत आक्रमक वागणे ही या रागाची प्रमुख लक्षणे असतात.क्राॅनिक अँगर : राग येणे हे एखाद्याच्या स्वभावाचे लक्षण झाले, की हा राग येताे. हा राग सतत असला, तरी त्याची पातळी फार कमी नसल्यामुळे त्याला कमी पातळीचा राग (लाे-लेव्हल अँगर) म्हणतात. हताश हाेणे, नैराश्य येणे, चिडचिड अथवा उत्तेजना असा स्वरूपात ताे दिसताे.
सायलेंट अँगर : या रागाचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्याला राग आल्याचे फक्त संबंधित व्यक्तीलाच माहिती असते, इतरांना नाही. आपल्याला राग येण्याची कारणे असे लाेक मनातच ठेवतात. त्याबाबत ते काही बाेलत नाहीत.
(अॅडे्निटव्ह/हॅबिच्युअल अँगर : या प्रकारच्या रागात अॅड्रिनलिन/डाेपामाइनची पातळी वाढते आणि ती व्यक्ती या संवेदनेची अॅड्निट हाेते. आपल्याला कशाचा राग येताे याचा विचार असे लाेक चेतन आणि अवचेतन रूपात करत राहतात.
राग दडपल्यामुळे नुकसान : रागाच्या भावनेवर नियंत्रणासाठी ताे व्यक्त करणे, दडपणे अथवा शांत करणे असे तीन मार्ग आहेत. आपला राग व्यक्त करणे हा सर्वांत चांगला मार्ग असताे.आपल्या भावना आक्रमक स्वरूपात व्यक्त न करता सकारात्मक पद्धतीने व्यक्त करता येतात. आपल्याला राग कशामुळे आला याचा विचार यात अपेक्षित असताे.रागामुळे शरीरातील ऊर्जेची वाढलेली पातळी सकारात्मक उपायाकडे वळवून राग नियंत्रित अथवा शांत करणे हा दुसरा मार्ग. राग दडपणे हा तिसरा मार्ग असला, तरी ताे जाेखमीचा आहे. कारण, राग व्यक्त न करता आल्यामुळे ताे मनात साठून राहताे आणि त्याला वाट न मिळाल्यास उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण हाेते.
राग दडपणारी माणसे चिडचिडी हाेऊन त्यांच्यात नकारात्मकता वाढत जाते. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) या संस्थेच्या माहितीनुसार, आपण जसे अनुभविताे, विचार करताे आणि कार्य करताे, त्यानुसार आपले शरीर प्रतिक्रिया देत असते. शरीर आणि मेंदू यांच्यात असलेल्या एक प्रकारच्या कने्नशनमुळे हे घडत असते. आपण रागावलेले असताे तेव्हा काहीही बराेबर नसल्याच्या पद्धतीने आपले शरीर प्रतिक्रिया देत असते.काही मनाेविकारांतही राग हे प्रमुख लक्षण असते. सततचा राग नव्या विकारांना निमंत्रण देताे.ही समस्या दीर्घकाळ असेल, तर...अनियंत्रित राग हा एकप्रकारचा मनाेविकार असला, तरी लाेक त्याकडे गांभीर्याने बघत नाहीत. तुम्हालासुद्धा सतत राग येत असेल, तर वेळेवर उपचार घेणे याेग्य ठरेल.