शेतकरी सक्षमीकरणासाठी ‘मिलेट मिशन’ महत्त्वाचे : मुख्यमंत्री शिंदे

    02-Feb-2023
Total Views |
 
 

Millet 
 
महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 काेटींची तरतूद; मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ राज्यातील पाैष्टिक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्राेत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना याेग्य हमीभाव मिळेल, यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 काेटींची तरतूद करण्यात आली आहे. यात या तृणधान्य प्रक्रिया उद्याेगांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया, मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया याेजना, स्मार्ट प्रकल्पांची सांगड घालून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.जेणेकरून या पिकांचे उत्पादन आणि त्यांच्या विक्रीची मूल्यसाखळी विकसित हाेईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हे मिशन महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र मिलेट मिशनचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बाेलत हाेते. कृषिमंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षणमंत्री दीपककेसरकर, उद्याेगमंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री भरत गाेगावले, आशिष जयस्वाल, प्रकाश सुर्वे, अण्णा बनसाेडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी यावेळी उपस्थित हाेते. तृणधान्य पूजन आणि तृणधान्यापासून बनवलेला केक कापून या मिशनचा प्रारंभ करण्यात आला.स्मार्ट प्रकल्पांतर्गत साेलापूरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट, हैदराबादच्या सहकार्याने सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
भरड धान्याचा विविध पदार्थांत वापर करून त्याचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी मूल्यसाखळी विकसित करण्यात येईल, असे सत्तार म्हणाले. डवले यांनी प्रास्ताविक केले.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी मासिक पाैष्टिक तृणधान्य विशेषांक, महाराष्ट्र मिलेट मिशन पुस्तिका आणि महाराष्ट्र मिलेट मिशन पाेस्टरचे प्रकाशन, तसेच महाराष्ट्र मिलेट मिशन संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. पाैष्टिक तृणधान्यात उल्लेखनीय काम करणारे शेतकरी आणि कृषी उद्याेजकांचा सत्कार करण्यात आला.