हंपी हे कर्नाटक राज्याच्या उत्तरेला असून बळ्ळारी जिल्ह्यात तुंगभद्रा नदीच्या काठावर वसले आहे. येथे इ.स.च्या 14 व्या शतकातील विजयनगर साम्राज्याचे अनेक पुरावशेष आहेत. हे युनेस्काेच्या जागतिक वारसा स्थळ सूचीतील वारसास्थळ असून याला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. काेणे एकेकाळी हंपी हे गाव वैभवसंपन्न हाेते; पण आजचे हंपी मात्र गतकाळच्या वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर वागवित उभे आहे. वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा या अवशेषांना दिला गेला आहे आणि त्यामुळे त्याचे जतनही उत्तम प्रकारे केले गेले आहे.
येथे असलेल्या प्रत्येक अवशेषाची एक कथा असून येथील दगडातील रथ, विठ्ठल मंदिर, राजाचा महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल, पुष्कर्णी, हजराराम मंदिर, विरूपाक्ष मंदिर, लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा यांचे दर्शन मनाला हळवे करून टाकते. येथील विठ्ठल मंदिरात म्युझिकल पिलर्स म्हणजे संगीताचे स्वर उमटणारे दगडी खांब आहेत. हंपी हे गाव पंपा क्षेत्र, किष्किंधा क्षेत्र, किंवा भास्कर क्षेत्र या नावानेदेखील ओळखले जाते. पंपा हे तुंगभद्रा नदीचे एक जुने नाव आहे. त्यावरूनच याला हंपी असे नाव पडले. यालाच विजयनगर किंवा विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाते.हंपीजवळच बदामी असून येथील चार पुरातन गुहांमध्ये काेरलेल्या लेणी बघण्यासारख्या आहेत. रस्ट रेड सँडस्टाेनमधील या लेण्यांतील तिसरी लेणी सर्वात माेठी आहे.
ही विष्णूला अर्पण केलेली लेणी असून येथे नटराज व नृत्यांच्या विविध 81 मुद्रा दाखविणारी शिल्पे, पहिल्या लेणीत अगस्त तीर्थ सराेवर व काठावर भूतनाथ मंदिर आहे. तसेच येथून जवळच बनशंकरी आहे. बनशंकरी हे पार्वतीचेच रूप असून द्रविडी प्रकारात हे मंदिर आहे. अष्टभुजा, व्याघ्रेश्वरी स्वरूपातील ही देवी असून हिरदा नावाचा तलाव येथे आहे.येथून जवळच असलेले पडक्कल चालुक्य वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध असून मलप्रभा नदीच्या काठावरचे हे ठिकाण चालुक्य राजांचे राज्याभिषेक हाेणारे स्थळ आहे. वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेली दहा मुख्य मंदिरे येथे आहेत. आठव्या शतकातले जंबुलिंग, कडासिद्धेश्वर व सर्वात माेठे असलेले विरूपाक्ष मंदिर अतिशय भव्य आह