नव्या शैक्षणिक धाेरणात मातृभाषेतून शिक्षणाला देणार महत्त्व : पंतप्रधान

13 Feb 2023 14:04:56
 
 

Education 
 
युवा पिढीला पुढे नेणारी धाेरणे शासनाकडून राबवली जात आहेत.काेणत्याही समाजघटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नयेत, यासाठी शैक्षणिक धाेरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व दिले जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले.अंधेरी मराेळ येथील अलजामिया-टस-सैफिया अरेबिक शैक्षणिक संस्थेच्या उद्घाटप्रसंगी पंतप्रधान बाेलत हाेते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लाेढा, अलजामिया-टस-सैफियाचे कुलगुरू डाॅ. सय्यदन मुफद्दल सैफुद्दीन, दाऊदी बाेहरा समाजाचे शहजादा अलिअसगर कलीम ऊद्दीन, शहजादा कियदजाेहर इज इज्जुद्दीन, तसेच दाऊदी बाेहरा समाजबांधव उपस्थित हाेते.
Powered By Sangraha 9.0