बाजरीची शिळी भाकरी आराेग्यदायीही...

    10-Feb-2023
Total Views |
 
 


Bhakari
 
सन 2023 वर्ष हे जगभर ‘जागतिक बाजरी वर्ष’ म्हणून साजरे केले आहे.जगभर लाेक बाजरीची भाकरी, खिचडी व इतर पदार्थ आवर्जून खात आहेत.साधारणपणे लाेक बाजरीची ताजी व गरम भाकरीच खातात. पण बाजरीची शिळी भाकरी गरम भाकरीपेक्षा जास्त स्वादिष्ट आणि रुचकर लागते.आधुनिक विज्ञानच्या दृष्टीने बाजरीची न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप चांगली आहे. फायबरयु्नत आणि हळूहळू पचत असल्यामुळे बाजरी अनेक रुग्णांसाठी महत्त्वाचे डाएट आहे.ओबेसिटी, डायबिटीस, हृदयविकार आणि लाइफ स्टाइल डिसऑर्डर बाजरी दूर करते.
 
डाॅ. संजय राठाेड यांनी बाजरीची शिळी भाकरी चविष्ट लागते, असे प्रतिपादन केले आहे. रात्री केलेली बाजरीची भाकरी सकाळी न्याहरीच्या वेळी खावी.ही शिळी भाकरी चविष्टच नव्हे, तर आराेग्यासाठीही खूपच चांगली आहे.भारतात विविध राज्यांत बाजरी हे मुख्य अन्न आहे व बाजरीचे पदार्थ तयार करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. यामागे स्थळ, काळ आणि ऋतूविज्ञान आहे.