जास्त ढेकर येणे खराब तब्बेतीचे लक्षण

    01-Feb-2023
Total Views |
 
 
 

Health 
सर्वसामान्य असा समज आहे की, ढेकर पाेटातील गॅस काढण्याची एक सामान्य प्रक्रिया आहे. बहुतेक लाेकांना जेवणानंतर खूप वेळानंतर ढेकर येतात व तेव्हा ते अन्न पचले असे मानतात. खरेतर नेहमीच असे हाेईल असे नव्हे. लाेक ढेकर येणे गांभीर्याने घेत नाहीत. परंतु, वारंवार नेहमीपेक्षा जास्त ढेकर येणे आजाराचे लक्षण असते.डाॅ. नटवर पाेरवाल (गॅस्ट्राे इंट्राेलाॅजिस्ट, जयपूर) यांनी सांगितले की, आठवड्यातून तीन वा त्यापेक्षा जास्त दिवस ढेकर येत असतील, तर ती चिंताजनक बाब आहे. जेवताना आपण हवाही गिळताे.साेडा, बीअर पित असताना त्याचा गॅस आवाजासाेबत परतताे.
 
जेव्हा जास्त ढेकर येतात तेव्हा त्याला गॅस्ट्राेइसाेफेगल रिफ्ल्नस राेग वा अ‍ॅसिड रिफ्ले्नसही म्हणतात. यामुळे छातीत जळजळ निर्माण हाेते. याचा अर्थ आपण आपल्या आहार व जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. अपचनानेही पाेट फुगणे, वरच्या भागात दुखणे, छातीत जळजळ, मळमळणे इ. लक्षणे दिसतील. या स्थितीत ढेकर येणेही आजाराचेच लक्षण असते. जेव्हा पाेटाचे अ‍ॅसिड अन्ननलिकेत येते तेव्हा आंबट ढेकर येतात. हे आपली तब्बेत बिघडलेली असल्याचे दर्शवते. असामान्य ढेकर हायटल हर्निया व अ‍ॅसिड रिफ्ले्नसचे लक्षण असते. अशावेळी एंडाेस्काेपी करणे आवश्यक असते.